इराणी टोळीला रोखण्याचे आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इराणी टोळीला रोखण्याचे आव्हान
इराणी टोळीला रोखण्याचे आव्हान

इराणी टोळीला रोखण्याचे आव्हान

sakal_logo
By

03688
संग्रहीत

इराणी टोळीला रोखण्याचे आव्हान
इचलकरंजीतील सोनसाखळी चोऱ्यांमागील सहभाग स्पष्ट; पोलिस यंत्रणा सतर्क
ऋषिकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता.३० : शहरात वर्षभरात सोनसाखळी चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. दिवसाआड सोनसाखळी चोरट्यांकडून विविध बहाण्याने वृद्ध महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावण्यात आले. या सोनसाखळी चोऱ्यांमागे इराणी टोळी असल्याचे स्पष्ट झाल्याने या टोळ्या आता पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत. आंतरराज्य कुख्यात इराणी टोळीची इचलकरंजीच्या गुन्हेगारीत एंट्री झाल्याने पोलिस यंत्रणाही आता खडबडून जागी झाली आहे. येत्या काळात वाढत्या गुन्हेगारीत इराणी टोळीची सक्रियता रोखण्याचे आव्हान इचलकरंजी पोलिसांसमोर आहे.
- - - - - - -

पायलट, स्नॅचर्स अन रायडरही
सोनसाखळी चोरीतील इराणी टोळीची खासियत आहे. चोरी करताना ते चारचाकी आणि दुचाकीचा वापर करतात. सोबत तरबेज असे पायलट, सराईत स्नॅचर्स आणि रायडरही ठेवतात. चोरी केल्यानंतर दुचाकीवरील माल चारचाकी वाहनात ठेवून क्षणार्धात पसार होतात. अचूक यंत्रणेचा वापर करून कमी वेळेत चोरी करून ही टोळी दूरच्या पल्यावर निघून जाते.
- - - - - - - - - - - -
पोलिसांच्या दोन पावले पुढे
चोरीची घटना घडल्यावर सीसीटीव्ही आणि प्राथमिक वर्णणानुसार पोलिस चोरट्याचा शोध घेतात. मात्र इराणी टोळीतील गुन्हेगार चोरीनंतर कपडे आणि वाहने बदलून त्वरित जिल्ह्यासह राज्याची सीमा सोडतात. यामुळे पोलिसांची चोरटे शोधाची जिल्ह्याच्या नाकाबंदी मोहीम फोल ठरते. पोलिसांच्या दोन पावले पुढे राहून इराणी टोळी सोनसाखळ्या चोऱ्या करते.
- - - -- - -
व्हाया इचलकरंजी मार्गे गोवा
इराणी टोळीचा चोरी आणि चोरीचा प्रवास नकाशाप्रमाणे आहे. पुणे, परभणी, लातूर, जळगाव, बीड मार्गे या टोळीचा चोरीचा प्रवास पुढे कर्नाटक आणि गोवा राज्यात आहे. या जिल्ह्यात चोरी केली की पुढील काही दिवसात दुसऱ्या जिल्ह्यात चोरी ही टोळी हमखास करते. आता मात्र या टोळीचा प्रवास व्हाया इचलकरंजी मार्गे बेळगाव, गोवा राज्यात झाला आहे. यामुळे ही टोळी इचलकरंजी पोलिसांच्या जाळ्यात अडकली.
- - - - - - -
स्थानिक गुन्हेगार टोळीच्या हाताशी
इराणी टोळीतील अनेक सराईत गुन्हेगार राज्याच्या विविध भागात घुसले आहेत. स्थानिक रेकॉर्डवरील गुन्हेगार, भुरटे चोरटे यांना गाठून टोळीत सामावून घेतले जात आहे. आता इचलकरंजीत इराणी टोळीने एंट्री केली आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगार या टोळीच्या हाताला लागले आहेत का, याचा तपास पोलिसांना करावे लागेल.
- - - - - -
इराणी टोळी अत्यंत चाणाक्ष आहे. पुणे, नाशिक आणि ठाणे यासह संपूर्ण राज्यच आता त्यांची चोरी करण्याची ठिकाण बनले आहे. शहरात इराणी टोळीकडून आणखी चेनस्नॅचिंगचे गुन्हे झाले असतील तर ते उजेडात येतील.
-महादेव वाघमोडे, पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर पोलिस ठाणे

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02258 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top