मर्दा विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मर्दा विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश सुरू
मर्दा विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश सुरू

मर्दा विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश सुरू

sakal_logo
By

मर्दा विद्यार्थी वसतिगृहात प्रवेश सुरू
इचलकरंजी : येथील स्वर्गीय दगडूलाल मर्दा विद्यार्थी वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी अनुसूचित जाती, भटक्या विमुक्त जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास, आर्थिक मागास अशा अशा विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश असणार आहे. पाचवी ते दहावी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना या वसतिगृहात राहण्याची, भोजनाची, वैद्यकीय मोफत व्यवस्था केली जाते. गरजू विद्यार्थ्यांनी वसतिगृहाचा लाभ घ्यावा, असे आवाहन वसतिगृह अधीक्षक अरुण पवार यांनी केले आहे.
- - - - - - - - - -
मनसेची शाखा सुरू
इचलकरंजी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेचे नवीन नगरपालिका जय-भीम नगर येथे उद्‍घाटन झाले. गाव तिथे शाखा तसेच शहरात भाग तेथे शाखा या संकल्पनेतून या शाखेचे उद्‍घाटन झाले. पुंडलिक जाधव, उपजिल्हा अध्यक्ष रवि गोंदकर, प्रताप पाटील, अनिल झाडबुके, शहाजी भोसले आदींच्या प्रमुख उपस्थितीत या शाखेचे उद्‍घाटन केले. महेश शेंडे, सुशील बनसोडे, बाळासाहेब राजमाने, संजय भंडारे, नितीन कटके, मनोज पाटील, उत्तम गुरव, विजय झाडबुके, जावेद नदाफ आदी उपस्थित होते.
- - - - - - -
रुपाली पवार यांचा सन्मान
इचलकरंजी : येथील सौ. रूपाली पवार यांना महाराष्ट्र वैभव शैक्षणिक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. पंचशील ट्रस्ट व एटिकेट्स फाउंडेशन सिंधुदुर्ग यांच्या वतीने सिंधू वैभव गौरव संमेलनात त्यांचा या पुरस्काराने गौरव केला. त्या सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दारूम गावडेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. शाळेच्या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला. डॉ. महेश कुंटे, प्रा. डॉ. बी. एन. खरात, पद्मजा खटावकर आदी उपस्थित होते.
- - - - - - -
वसतिगृहात प्रवेश सुरू
इचलकरंजी : हातकणंगले येथील मागासवर्गीय मुलांच्या वसतिगृहात प्रवेश सुरू केले आहेत. चालू शैक्षणिक वर्षासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिक मागास प्रवर्ग या जातीतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. पाचवी ते दहावी या विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवेश आहे. वसतिगृहात राहण्याची, भोजनाची, गरम पाणी आदी सोयी मोफत केल्या आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावेत, असे आवाहन वसतिगृह अधीक्षक मिथुन डांगे यांनी केले आहे.
- - - - - - - -
बस स्थानकातील खड्डे बुजवण्याची मागणी
इचलकरंजी : बस स्थानकातील खड्डे बुजवा, या मागणीचे निवेदन इचलकरंजी नागरिक मंचने आगारप्रमुख संतोष बोगरे यांना दिले. बस स्थानक परिसरात ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. तसेच वाहक चालक यांचेही हाल होत असून बसेसचेही नुकसान होत आहे. त्यामुळे खड्डे तातडीने बुजवून घ्यावेत, अशी मागणी आगारप्रमुख बोगरे यांच्याकडे केली. आगारप्रमुखांनी खड्डे बुजविण्याचे आश्वासन दिले. तसेच इतर समस्यांविषयीही पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. इनामचे राजू कोन्नूर, सुहास पाटील, हरिश देवाडीगा, महेंद्र जाधव, राम आडकी आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02282 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top