कुंभोज बससेवा पुर्ववत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुंभोज बससेवा पुर्ववत
कुंभोज बससेवा पुर्ववत

कुंभोज बससेवा पुर्ववत

sakal_logo
By

कुंभोज बस पूर्ववत
इचलकरंजी : कुंभोज बस सेवा पुर्ववत सुरू केली आहे. इचलकरंजी आगारातर्फे इचलकरंजी- कुंभोज ही बस चालवण्यात येत होती. कोरोनामुळे ती बंद केली होती. आता इचलकरंजी आगाराची वाहतूक चांगल्या प्रकारे सुरू झालेली आहे. त्यामुळे सोमवारपासून (ता. ६) इचलकरंजी बसस्थानकातून ही बसफेरी सुरू करण्यात येत आहे. पहिली बस इचलकरंजीहून सकाळी सात वाजता सुटणार आहे. कुंभोजहून सकाळी सात वाजून ४५ मिनिटांनी निघणार आहे. अशाप्रकारे एक तासानंतर वाहतूक सुरू राहणार आहे. तरी या बसचा लाभ इचलकरंजी शहर व हातकणंगले तालुक्यातील प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ आगार व्यवस्थापक संतोष बोगरे यांनी केले आहे.
- - - - -
निवृत्त शिक्षकांचा सत्कार
इचलकरंजी : रेंदाळ (ता. हातकणंगले) येथील गुरुवर्य कृष्णाची दत्तात्रय पाटील विश्वस्त समिती आणि कविवर्य एकनाथ पांडुरंग रेंदाळकर वाचनालयातर्फे निवृत्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कु. द. पाटील यांच्या पंधराव्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक क्षेत्रातून निवृत्त झालेले व सध्या सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे निवृत्त शिक्षकांचा सत्कार केला. जीवन पाटील, विरूपाक्ष भाकरे, कुमार वाजे, वनिता कावडे, मंगला माळी या शिक्षकांचा सत्कार केला. अध्यक्षस्थानी बाबुराव कारदगे होते. प्रमुख पाहुणे डॉ. जी. पी. माळी, रमेश चव्हाण, मौला जमादार उपस्थित होते. मान्यवरांच्या उपस्थितीत कृष्णाजी दत्तात्रय पाटील गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी डॉ. एम. जी. पाटील, आर. एम. पाटील, व्ही. आर. बडवे, रफिक सुरज आदी उपस्थित होते.
- - - - -
हरीभाऊ नाईक यांना श्रद्धांजली
इचलकरंजी : गांधीवादी विचाराचे कामगार नेते हरीभाऊ नाईक यांना इंटककडून श्रद्धांजली वाहण्यात आली. कामगार नेते शामराव कुलकर्णी यांनी कामगार चळवळीला गांधीवादाचे अधिष्ठान म्हणून निरनिराळ्या व्यवसायातील कामगारांचे नेतृत्व करत कामगारांना निर्धाराने न्याय देणारा देशातील मोठा कामगार नेता म्हणून हरीभाऊ नाईक यांच्याकडे पहावे लागेल, असे सांगितले. अध्यक्षस्थानी इंटकचे अध्यक्ष शिवाजीराव भोसले होते.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02284 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top