घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडी
घरफोडी

घरफोडी

sakal_logo
By

खिडकीचे गज कापून
कोरोची येथे घरफोडी
८५ हजार रोकडसह पावणेदोन लाखांचा ऐवज पळविला
इचलकरंजी, ता. ९ : हॉटेल व्यावसायिकाच्या बंद घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्याने पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज पळवून नेला. रोख रकमेसह सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला. ही घटना कोरोची (ता. हातकणंगले) येथील विवेकानंदनगर भागात घडली. याप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
शहापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कोरोचीतील तीन विहिरीजवळ राहणाऱ्या संजय धोंडिराम माने (वय ४६) यांचा हॉटेल व्यवसाय आहे. माने कुटुंबीय ६ रोजी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर कुलूपबंद होते. बुधवारी (ता. ८) ते परतले असता त्यांच्या बंद घराच्या खिडकीचे गज कापल्याचे निदर्शनास आले. चोरट्यांनी बेडरूममधल्या तिजोरीतून रोख ८५ हजार रुपये, सोन्याचे गंठण, बोरमाळ, अंगठ्या, कानातील टॉप्स असे सव्वादोन तोळ्यांचे दागिने असा पावणेदोन लाखांचा ऐवज चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. याबाबत माने यांच्या फिर्यादीनुसार शहापूर पोलिस ठाण्यात अनोळखी चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

चोरीची नवी पद्धत
शहर व परिसरात आतापर्यंत झालेल्या घरफोडीत सर्रासपणे बंद घराचे कुलूप तोडून अथवा कडी कोयंडा उचकटून चोऱ्या झाल्या. आता मात्र या घरफोडीत घराच्या खिडकीचे गज कापण्यात आले. चोरट्यांची ही चोरीची बदलती पद्धत पोलिसांना आव्हानात्मक आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02317 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top