समाधान योजना समाधानकारक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाधान योजना समाधानकारक
समाधान योजना समाधानकारक

समाधान योजना समाधानकारक

sakal_logo
By

03834
संग्रहीत
-----------------
समाधान योजनांतून नागरिक समाधानी
शासन आपल्या दारी उपक्रम; गावभेटीतून शासकीय कामांची निर्गत
इचलकरंजी, ता. १३ : नागरिकांना विविध शासकीय कामांसाठी गाव सोडून विविध शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. आता नागरिकांचा वाढता त्रास शासनाने थांबवला आहे. शासन आपल्या दारी या उपक्रमातून सर्व योजना एकाच छताखाली नागरिकांना उपलब्ध होत आहेत. यामुळे नागरिकांची कामे एकाच छताखाली जलद गतीने मार्गी लागत आहेत. समाधान योजनांतर्गत इचलकरंजी अप्पर तहसील कार्यालयाकडून विविध शासकीय कामांचा प्रवास गावोगावी सुरू झाला असून यामुळे नागरिक समाधानकारक होत आहेत.
नागरिकांच्या अनेक गरजा शासकीय कार्यालयापर्यत येऊन थांबतात; मात्र अनेक वर्षांपासून हा प्रवास गावोगावी नागरिकांना कठीण होऊन बसला आहे. गाव सोडून दूरवर शहरात अथवा तालुक्याला जात शासकीय कामे मार्गी लावावी लागतात. शिवाय कामांची पूर्तता करताना अधिकचा त्रास आणि ताटकळतपणा ठरलेला. यामुळे नागरिकांचा प्रशासनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. हे ओळखून शासनाच्या विविध योजनेतील कामे लोकाभिमुख करत आता शासन नागरिकांच्या दारोदारी जात आहे. महाराजस्व योजना अभियानातून शासन आपल्या दारी उपक्रमातून समाधान योजनेअंतर्गत विविध शासकीय विभागांची कामे समाधान देणारी ठरत आहेत.
सध्या अप्पर तहसील कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या माणगाव, यळगूड गावात हा उपक्रम झाला आहे. अनेक नागरिकांची कित्येक वर्षे थांबलेली कामे पूर्ण झाली. नागरिकांमध्ये जनजागृती करून संबंधित गावात हा उपक्रम राबवला जातो. आरोग्य विभागापासून महावितरणपर्यत प्रलंबित व नवीन कामे जागीच पूर्ण केली जात आहेत. शासनाच्या या उपक्रमातून अख्ख्या गावाची कामे मार्गी लागत असून प्रलंबित कामांचा तत्काळ निपटारा होत आहे. त्यामुळे आता अनेक गावे या उपक्रमाच्या प्रतीक्षेत आहेत.
- - - - - - - -
या विभागाच्या योजना दारी
*आरोग्य विभाग
*तहसील कार्यालय
* पंचायत समिती
* भूमि अभिलेख
* पाटबंधारे विभाग
* एसटी महामंडळ
* पोलिसपाटील
*महावितरण
- - - - - - - -
दृष्‍टिक्षेपात
अप्पर तहसील कार्यालय
* मंडल कार्यक्षेत्र - ४
* गावे - २०
* नगरपालिका - २

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02336 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top