देशी फळांची आवक ठप्प | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देशी फळांची आवक ठप्प
देशी फळांची आवक ठप्प

देशी फळांची आवक ठप्प

sakal_logo
By

29637
-------------
देशी फळांची आवक ठप्प
भाजीपाल्याची मागणी, आवक स्‍थिर; फुलांची मागणी घटली
इचलकरंजी, ता. १६ : फळबाजारात फळांची आवक नसून मागणीही कमालीने घटली आहे. सध्या फळांचे दर गगनाला भिडले आहेत. देशी फळांची आवक ठप्प झाली आहे. सर्वाधिक मागणी असलेल्या सफरचंदासाठी बाजाराला परदेशी आवकेवर तहान भागवावी लागत आहे. काही दिवसांपूर्वी दाखल झालेल्या हंगामी फळांचे दर कमी होत आहे. आंब्याची मागणी आणि आवक अद्याप बाजारात आहे. राजा अनससची आवकही वाढताना दिसत आहे. कलिंगडची आवक अंतिम टप्प्यात आहेत.
भाजीपाला बाजारात मागणी आणि आवक दोन्हीही स्‍थिर आहे. फळभाज्याचे दर जैसे थे आहेत. पालेभाज्यांची आवक सुधारत आहे. नियमित पाऊस सुरू झाल्यावर भाजीपाल्यावर काहीसा परिणाम दिसेल. खाद्यतेलाचे भाव पुन्हा उतरण्यास सुरुवात झाली आहे. पामतेल, सोयाबीन तेलाचे दर प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. लग्नसराई मुहूर्त, समारंभ थांबल्याने फुलांची मागणी घटली आहे. कडधान्य बाजार स्थिर आहे.
- - - - - - - - -
प्रतिकिलो रुपये भाजीपाला : टोमॅटो-५०ते ६०. दोडका-४० ते ५०, वांगी- ७० ते ८०, कारली-३० ते ४०, ढोबळी मिरची- ४०ते ५०, मिरची-४० ते५०, फ्लॉवर-२५ ते ३०,कोबी-२० ते ३०, बटाटा-२५ ते ३० कांदा -२२ ते २५, लसूण-४०ते ५०, आले- ३०-४०, लिंबू-१०० ते ४०० शेकडा, गाजर-५० ते ६०, बीन्स- १०० -१२०, भेंडी- ३० ते ४०, काकडी- ५०ते ६०, गवार-६० ते ८० ,दुधी २५ ते ३०, कोथिंबीर -२० ,मेथी - २५, इतर पालेभाज्या १० रुपये पेंढी.
- -
खाद्यतेल : शेंगतेल-१८५ ते १९० , सरकी- १७० ते १७५, सोयाबीन- १६५ ते १७०, सुर्यफूल-१९०- २००, पामतेल- -१६० ते १६५.
- --
फुले - केशरी व पिवळा झेंडू -६० ते ८० , निशिगंध-७० ते ८०,गुलाब -१५० , गलांडा- ८०-९० ,शेवंती - २०० अष्टर -१००- १२०.
- - - - -
फळे : सफरचंद-२०० ते २५०, संत्री -१४०ते १५० मोसंबी-१२० ते १४०, डाळिंब-१५० ते २००, चिकू-१००ते १२०, पेरु-६०ते १००, कच्चा खजूर- १२०-१५०,ड्राय खजूर - १५० -२००, पपई- ५० ते ६०, कलिंगड -२५ ते ३० ,अननस -२० ते ८०, मोर आवळा -१०० ते १२०, केळी- ५०ते ६० डझन, देशी केळी - ६०ते ८० डझन,किवी -१०० -१२०( लहान बॉक्स), ड्रॅगन- २०० ते २५०, परदेशी चिंच-१४०, लेची -३५० ते ४००, ओला बदाम -२००ते ४००.
-- -
कडधान्य : हायब्रीड ज्वारी- २५, बार्शी शाळू- २५ ते ४० ,गहू- २८ ते ३६ , हरभराडाळ -६० ते ६२, तुरडाळ- ८७ते ९५ , मुगडाळ- ९२ ते ९६, मसूरडाळ- ८५ ते ८७, उडीदडाळ-९० ते १००, हरभरा- ५० ते ५३ , मूग- ८५ ते ८७ , मटकी- १२५ ते १३०, मसुर- ७७ , फुटाणाडाळ-७० चवळी-८०, हिरवा वाटाणा-६०, छोला - १००.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02353 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top