
घरफोडी
कोरोचीत कपड्याच्या दुकानात चोरी
इचलकरंजी : कोरोची (ता. हातकणंगले) येथील कपड्याचे बंद दुकान फोडून चोरट्यांनी ५२ हजारांचा मुद्देमाल पळविला. याबाबत शहापूर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दुकान मालक वृषभ राजेंद्र पाटील (वय २१) काल दुकान बंद करून घरी गेले. मध्यरात्री चोरट्यांनी व्ही. पी. मेन्स वेअर कपड्याच्या दुकानातून सुमारे ५० हजार रुपयांचे विविध शर्ट, पॅन्ट आणि २ हजार रोकड लंपास केली आहे. याप्रकरणी चोरट्यावर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत दुकान मालक वृषभ राजेंद्र पाटील (वय २१) यांनी शहापूर पोलिसांत तक्रार दिली आहे.
02580
बेपत्ता व्यापारी पोलिसांत हजर
हातकणंगले ः चार दिवसांपासून बेपत्ता असलेला येथील स्वीट कॉर्न व्यापारी अशोक वासुदेव काणेकर (वय ५५) आज स्वतःहून हातकणंगले पोलिसांत हजर झाला. कोरोना काळात झालेल्या आर्थिक नुकसानीमुळे वैफल्यग्रस्त झाल्यामुळेच स्वतःहून घरांतून निघून गेलो होतो. माझी कोणाबाबतही कसलीही तक्रार नसल्याचा जबाब त्याने पोलिसांना लिहून दिला आहे. श्री काणेकर बेपत्ता असल्याची फिर्याद त्यांच्या मुलाने दिली होती. आज सकाळी तो स्वतःहूनच पोलिसांत हजर झाला. त्यानंतर त्याने कोणाबाबतही तक्रार नसल्याचा जवाब लिहून दिला आहे.
कवठेसारमध्ये एकाची आत्महत्या
जयसिंगपूर : राहत्या घराच्या लोखंडी छताला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी रात्री ९ वाजता कवठेसार (ता. शिरोळ) येथे घडली आहे. सुनील आनंदा शिंदे (वय ४२) असे मृताचे नाव आहे. घटनेची नोंद जयसिंगपूर पोलिसांत झाली आहे. सुनील शिंदे याचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्याला दारूचे व्यसन होते. त्यातून त्याने आत्महत्या केल्याची वर्दी भाऊ अरुण आनंदा शिंदे यांनी दिली आहे. तपास अभिजित भातमारे करीत आहेत.
कसबा सांगावात एकाची आत्महत्या
कसबा सांगाव ः येथील अजीज अहमद कानिरे (वय ४८) याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवार (ता. १५) सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. अहमद बंडू मुल्ला यांनी कागल पोलिसांत वर्दी दिली. अजीज याने दारूच्या नशेत आत्महत्या केल्याची नोंद केली आहे. त्याच्या मागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02358 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..