हुपरी हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुपरी हल्ला
हुपरी हल्ला

हुपरी हल्ला

sakal_logo
By

हुपरीतील दोघांवर हल्ला

हुपरी : मोटारसायकल आडवी मारल्याच्या कारणावरून दोघांवर हल्ला करून जखमी केल्याची घटना येथे रात्री उशिरा घडली. प्रतीक बाबासो गाट (गणेश माळ हुपरी) व प्रथमेश विजय पांढरे (संभाजी मानेनगर, हुपरी) अशी जखमींची नावे आहेत. याप्रकरणी हुपरी पोलिसांत शुभम सखाराम पांढरबळे (मातंग वसाहत, हुपरी) याच्यासह तिघा अनोळखी तरुणांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे. कोल्हापूर रस्त्यावरील एका हॉटेलसमोर ही घटना घडली. याबाबतची फिर्याद प्रतिक बाबासो गाट यांने दिली आहे. मोटारसायकलवरून घरी जात असताना शुभम पांढरबळे याच्यासह तिघांनी १२ जूनला झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून  शिवीगाळ करून लाथाबुक्यांनी व हत्याराने मारहाण केल्याचे म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02360 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top