हुपरी अपहार बडतर्फ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुपरी अपहार बडतर्फ
हुपरी अपहार बडतर्फ

हुपरी अपहार बडतर्फ

sakal_logo
By

इचलकरंजी शाखेतील दोघे बडतर्फ
अध्यक्ष अरुण महाजन; रेंदाळ सहकारी बँकेत दीड कोटी अपहार प्रकरण
हुपरी, ता. २२ : रेंदाळ येथील आबासाहेब पाटील रेंदाळ सहकारी बँकेच्या इचलकरंजी शाखेतील एक कोटी साठ लाख तीस हजार रुपयांच्या अपहारप्रकरणी शाखा व्यवस्थापक रयाजी गणपती पाटील व कॅशिअर किरण तानाजी पाटील यांना बडतर्फ केले असून त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दिल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अरुण महाजन व सरव्यवस्थापक एस. एस. जाधव यांनी पत्रकार बैठकीत दिली.
ते म्हणाले, ‘‘इचलकरंजी शाखेत घोटाळा झाल्याचे गत मे महिन्यात आढळले होते. अंतर्गत तसेच विशेष लेखा परीक्षकांमार्फत चौकशी केली. त्यानुसार आठ जूनला प्राप्त झालेल्या अहवालात रयाजी पाटील व किरण पाटील यांनी एक कोटी साठ लाख तीस हजार रुपयांचा अपहार केल्याचे निष्पन्न झाले. अहवाल प्राप्त होताच बँकेने दोषींविरोधात कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार व्यवस्थापक रयाजी पाटील व कॅशिअर किरण पाटील यांच्यावर बडतर्फीची कारवाई केली आहे. दोघांच्याही स्थावर मिळकती ताब्यात घेतल्या असून अपहाराची रक्कम वसूल केली जात आहे. दोघांच्या ग्रॅच्युइटी तसेच इतर सर्व प्रकारच्या देय रक्कमा गोठवण्यात आल्या आहेत.’’
रयाजी पाटील व किरण पाटील दोघेही बेपत्ता असून त्यांचा शोध घेण्याची मागणी पोलिसांत केल्याचे त्यांनी सांगितले. इचलकरंजी शाखेतील कर्ज मंजूर अधिकारी प्रभाकर पांडुरंग भोरे यांनाही चौकशीअंती निलंबित केले असून इतर पाच कर्मचाऱ्यांचीही खातेनिहाय चौकशी सुरू आहे.
बँकेचे चार्टर्ड अकाउंटंट डी. ए. चौगुले, उपाध्यक्ष रावसाहेब कोळी, संचालक खुतुबुद्दीन मोमीन, चंद्रकांत शिंगारे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02398 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top