अपघात एक ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघात एक ठार
अपघात एक ठार

अपघात एक ठार

sakal_logo
By

३९४३
दुचाकी-मोपेड धडकेत
कोरोचीतील एकाचा मृत्यू
इचलकरंजीत घटना; दोघे गंभीर, मोपेडस्वार पसार

इचलकरंजी, ता. २२ : हॉटेलमधून जेवण करून घरी निघालेल्या दुचाकीला मोपेड धडक दिल्याने तिघे गंभीर जखमी झाले. या अपघातात कोरोची (ता. हातकणंगले) येथील एकाचा मृत्यू झाला. बसप्पा संगाप्पा बिदरगड्डी (वय ४५, रत्नदीप वसाहत, कोरोची) असे त्याचे नाव आहे. विरुपक्ष बसप्पा कोष्टी (४५) यांच्यावर सांगली सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात मंगळवारी (ता. २१) रात्री येथील पंचगंगा नदी पुलावर घडला. याबाबतची फिर्याद जखमी फिरोज रुकमुद्दिन पेंढारी (कोरोची) यांनी गावभाग पोलिसांत दिली. पसार झालेल्या मोपेडस्वाराचा पोलिस शोध घेत आहेत.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, जखमी फिरोज पेंढारी गवंडी काम करतात. विरुपक्ष कोष्टी, बसप्पा बिदरगड्डी त्यांचे शेजारी राहतात. तिघेजण दुचाकी (एमएच ०९ डीटी ०६९१) वरून शिवनाकवाडी येथे जेवण्यास गेले होते. जेवण करून घरी परतत असताना विरुपक्ष दुचाकी चालवत होता. पंचगंगा नदी पुलाजवळ पोहचले असता समोरून आलेल्या मोपेडने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात तिघेही जखमी झाले. कोष्टी व बिदरगड्डी रस्त्यावर कोसळले आणि फरफटत गेले. घटनास्थळावरून मोपेडस्वार पसार झाला. जखमींना आयजीएम रुग्णालयात दाखल केले. कोष्टी आणि बिदरगड्डी यांची प्रकृती अतिगंभीर असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना सांगली सिव्‍हिल रुग्णालयात हलवले. उपचारादरम्यान बिदरगडी याचा मृत्यू झाला. याप्रकरणी जखमी पेंढारी यांच्या फिर्यादीनुसार गावभाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02399 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top