इलेक्ट्रिक दुचाकीने इचलकरंजीत घेतला पेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

fire Electric bike
दुचाकी पेटली

इलेक्ट्रिक दुचाकीने इचलकरंजीत घेतला पेट

इचलकरंजी - येथील गणेशनगर भागात रस्त्यावरच इलेक्ट्रिक दुचाकीने अचानक पेट घेतला. चालक दुचाकीवरून गणेशनगर गल्ली नंबर तीन मधून निघाले होते. अचानक गाडीतून धूर येऊ लागल्यामुळे चालकाने दुचाकी रस्त्याच्या बाजूस उभी केली. बघता बघता दुचाकी पेटली.

परिसरातील नागरिकांनी गाडीजवळ धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीचा आणखी भडका उडाला. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाली होती. यावेळी काही वेळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02413 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..