दहावी विद्यार्थी सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दहावी विद्यार्थी सत्कार
दहावी विद्यार्थी सत्कार

दहावी विद्यार्थी सत्कार

sakal_logo
By

दहावी निकाल
-------------
03975

न्यू हायस्कूल
इचलकरंजी : दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील दहावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ झाला. दहावीचा निकाल ९७.९७ टक्के लागला. अनुक्रमे महेक शेख (९२.६० टक्के), श्वेता सुढाळ (९२.४०), गौरी जोशी (९१) गुण मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष अरुणराव खंजिरे यांच्याहस्ते केला. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. मुरदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक एस. ए. पाटील होते. सूत्रसंचालन सौ. व्ही. टी. खेडकर यांनी केले. आभार सौ. एस. ए. बिरनाळे यांनी मानले.
- - - - - -
03974
सनम अत्तार
इंदुमती शंकरराव गाट हायस्कूल
रांगोळी : येथील इंदुमती शंकरराव गाट हायस्कूलचा दहावी परिक्षेचा निकाल ९०.४७ टक्के लागला. विद्यालयात अनुक्रमे सनम अत्तार (८४.६० टक्के), अनुजा वडगावे (८०.६०), सृष्टी कदम (७७.६०) गुण मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालय व स्कूल कमिटीतर्फे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक शिक्षक, शिक्षिका आदींचे मार्गदर्शन लाभले.
- - - - - - - -
रामभाऊ जगताप हायस्कूल
इचलकरंजी : रामभाऊ जगताप हायस्कूलमध्ये दहावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ झाला. विद्यालयात अनुक्रमे वरद नगरे (९३.४० टक्के), समर्थ रेडेकर (९२.४०), यश दिवटे (९०.२०) गुण मिळवले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे कार्याध्यक्ष रमेश मर्दा यांच्याहस्ते केला. मुख्याध्यापिका संजीवनी चिंगळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मुख्याध्यापिका गीता खोचरे यांनी मनोगत व्यक्त केले. सुजाता वडर यांनी सूत्रसंचालन केले. पंढरीनाथ माळकरी यांनी आभार मानले.
- - - - - -
01345
ॲचिव्हर्स इंग्लिश स्कूल
रूकडी ः ॲचिव्हर्स इंग्लिश स्कूल व मनीष पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, अतिग्रे (ता. हातकणंगले) चा निकाल शंभर टक्के लागला. गुणानुक्रमे विद्यार्थी असे ः श्रद्धा पाटील (९४.२० टक्के), श्वेता पाटील (९४), अमृता खोत (९४), खुशी भोकरे (९२.२०). यासाठी संस्थापक सचिव सचिन आंबी यांचे मार्गदर्शन व प्रेरणा लाभली.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02418 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..