सैनिक टाकळीतील झिरो बजेटची शेती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सैनिक टाकळीतील झिरो बजेटची शेती
सैनिक टाकळीतील झिरो बजेटची शेती

सैनिक टाकळीतील झिरो बजेटची शेती

sakal_logo
By

03979
------------
लोगो ः शेतीतील वेगळ्या वाटा (टुडे १ वरून घेणे)
-------------
सैनिक टाकळीतील झिरो बजेटची शेती
अजित पाटील आंतरपिकातून काढतात खर्च; शेतकऱ्यांसमोर आदर्श
डी. आर. पाटील : सकाळ वृत्तसेवा
शिरोळ, ता. २६ : सेंद्रिय पद्धतीने उसाची लागण तसेच खोडवा पिकामधून विविध आंतरपिके घेऊन सैनिक टाकळी (ता. शिरोळ) येथील शेतकरी अजित अशोक पाटील यांनी भाजीपाला घेऊन सेंद्रिय शेती जपली आहे. ऊस पीक घेताना सर्व खर्च आंतरपिकातून काढून झिरो बजेटची शेती पाटील यांनी केली आहे. बदलल्या शेतीतून त्यांनी शेतकऱ्यांसमोर आदर्श ठेवला आहे.
अजित पाटील सात वर्षांपासून शेतामध्ये रासायनिक खताचा वापर न करता सेंद्रिय शेती घेण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीच्या दोन वर्षात सेंद्रिय शेती तोट्यात गेली. मात्र श्वाशत शेतीची वाट न सोडता सेंद्रिय शेती करण्याचा अट्टाहास सुरूच ठेवला. अडीच एकर शेतीमध्ये ऊस पीक घेताना वेगवेगळ्या प्रकारची आंतरपिके ते घेत आहेत. उसाची लागण केल्यानंतर हवामानाचा अंदाज घेत घेवडा वरणा, भुईमूग, हरभरा, दोडका, काकडी यासारखी आंतरपिके पाटील घेत आहेत.
कुरुंदवाड, टाकळी, टाकळीवाडी, खिद्रापूर येथील बाजारात सेंद्रिय भाजीपालाची विक्री केली जात आहे. भाजीपाल्यावर कीटकनाशकाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जिवाणुची फवारणी घेण्यात येते. सेंद्रीय भाजीपाला असल्याने भाजीपाल्यावर वेगळे तेज दिसून येत असल्याने बाजारात अर्ध्या तासामध्ये भाजीपाल्याची विक्री होते. सेंद्रिय शेती पाहण्यासाठी शेतकरी येतात. याबाबत प्रोत्साहन देत संबंधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. आंतरपिकाच्या माध्यमातून ऊसपिकाचा सर्व खर्च निघून स्वतःच्या कुटुंबाला तसेच ग्राहकाला आरोग्यदायी सेंद्रिय भाजीपाला देत असल्याचे समाधान पाटील यांना मिळत आहे.
-- - -
03978
सेंद्रिय पद्धतीने उसाचे पीक घेत आहे. उसाची लागण व खोडवा अशी दोन पिके घेत असताना लागणीच्या सुरुवातीच्या काळात व उसाच्या खोडवा पिकाच्या सुरुवातीच्या काळात आंतरपिकाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला घेत आहे. हा भाजीपाला चवदार व आरोग्यदायी असल्याने स्थानिक बाजारपेठेमध्ये तत्काळ विक्री होते. परिसरातील सात गावांमध्ये हक्काचा ग्राहक बनला आहे. रासायनिक भाजीपाल्याच्या तुलनेत जादा दर मिळत नसतानाही आरोग्यदायी भाजीपाला देत असल्याचे समाधान आहे.
-अजित पाटील, सैनिक टाकळी
- - - - - - - - - -

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02420 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..