पान ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३
पान ३

पान ३

sakal_logo
By

हुपरीत जुगार अड्ड्यावर छापा
१४ जणांना अटक; ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त

हुपरी, ता. २६ : येथे सुरू असलेल्या तीनपानी जुगार अड्ड्यावर हुपरी पोलिसांनी छापा टाकून १४ जणांना अटक केली. कारवाईत रोख १५ हजार ८० रुपयांसह ७६ हजार पाचशे रुपयेंचे ९ मोबाईल संच, असा सुमारे ९१ हजार ५८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेले सर्व परप्रांतीय असून ते येथे चांदी कारागिरीसाठी आले आहेत. येथील काजवे गल्लीतील अशोक खोत यांच्या घरात पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई शनिवारी (ता. २५) रात्री उशिरा केली. संशयितांची नावे अशी, मनोज गिताराम गोस्वामी, सुरेश बसंतराम माहौर, विजय सुरेश माहौर, करण विजेयंद्र कुशवाह, (सर्व रा. मूळ गाव बोधला आग्रा जि. आग्रा), पवन चंदनसिंह महौर (रा. मूळ गाव जत्रलगंज जि. मथुरा), पंकज सुरेश प्रजापती (रा. मूळ गाव पिनाट बाहा जि. आग्रा), रिंकुकुमार गोवर्धन प्रजापती (रा. हरीदर्शन मंदिर जवळ सुतीयानी गडसानी जि. आग्रा), दीपू विनोद शर्मा (रा. नगलापती विद्यानगर, जि. आग्रा), ललित फकिरचंद माहौर (रा. शमशाबाद जारौली जि. आग्रा), जितू सुमकुमार प्रजापती (रा. बोडेगाम, जि. आग्रा), अजय भीमसिंह माहौर (रा. सदरवट्टी, जि. आग्रा), कमल सतीश सक्सेना (रा. खेडीयामोर, अर्जुननगर जि. आग्रा), सोनू हिरालाल वर्मा (रा. अमरपुरा बोधला, जि. आग्रा), सनी चंद्रप्रकाश माहौर (रा. सिरकीमंडी, जि. आग्रा). नंतर सर्वांची जामिनावर सुटका झाली. सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष तेली, जमीर जमादार, सावरतकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02421 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..