
करिश्मा शेख-जमादार सत्कार
32940
------
करिश्मा शेख-जमादार सत्कार
इचलकरंजी : परिस्थिती कितीही बिकट असो, खडतर परिश्रम केल्यास यश मिळणारच, असे प्रतिपादन नूतन पोलिस उपनिरीक्षक करिश्मा शेख -जमादार यांनी केले. येथील नालंदा अकादमीत पोलिस उपनिरिक्षकपदी नियुक्ती झाल्याबद्दल तिचा सत्कार केला. या वेळी बोलत होत्या. प्राचार्या प्रो. डॉ. त्रिशला कदम, दत्तात्रय तराळ, संजय कुरणे, सिद्धार्थ शिंदे, प्रा. संगीता पाटील, नजमा शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार केला. या वेळी विद्यार्थी उपस्थित होते.
- - - - - - - - - -
32941
‘व्यंकटेश’मध्ये गुणवंतांचा सत्कार
इचलकरंजी : व्यंकटेश महाविद्यालयातील बारा विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त झाली. महाविद्यालयाने दरवर्षीप्रमाणे या वर्षीही यशाची परंपरा कायम ठेवली आहे. बी. कॉम. अभ्यासक्रमांमध्ये प्रणील रावळ, रुचिता गडक, संस्कृती पाटील, नेहा कारंडे, ऋतुजा खुडे, समरीन मानकर, श्रावण लाड, रोहित अंचलिया, दिव्या सोनटक्के तर एम. कॉम. अभ्यासक्रमामध्ये वृद्धी शहा, रामेश्वरी कोल्हापुरे व स्नेहल जगदाळे यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त झाली. याबद्दल यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला. या वेळी ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवास बोहरा, सचिव बाबासाहेब वडिंगे व विश्वस्त एस. बी. चंगेडिया यांची प्रमुख उपस्थिती होती. प्राचार्य डॉ. व्ही. ए. माने यांनी प्रास्ताविक केले. शिष्यवृत्ती विभागाचे कामकाज पाहणारे कार्यालयीन कर्मचारी महेश चौगुले यांचेही अभिनंदन केले. उपप्राचार्य प्रो. डॉ. एन. एम. मुजावर, प्रा. अमीन बाणदार आदी उपस्थित होते.
- - - - - - - - - -
रोटरी डेफ स्कूलमध्ये कृषी दिन
इचलकरंजी : रोटरी डेफ स्कूल तिळवणी येथे कृषी दिन साजरा केला. अध्यक्षस्थानी अभिनंदन देशमुख होते. मुख्याध्यापिका सौ. स्मिता रणदिवे स्वागत व प्रास्ताविक केले. श्री. देशमुख यांच्याहस्ते वसंतराव नाईक प्रतिमेचे पूजन केले. सूत्रसंचालन सौ. रुपाली सलगर व संतोष गांगोडे यांनी केले. आभार सौ. अमृता पाटील यांनी मानले.
- - - - - - - - - -
पूजा दानोळेचा सत्कार
इचलकरंजी : येथील दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजची विद्यार्थिनी पूजा दानोळे हिने खेलो इंडिया युथ गेम्स व एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत विविध पदकांची कमाई केली. संस्थेतर्फे तिचा सत्कार केला. सायकलिंगमध्ये वैयक्तिक परशुट प्रकारात सुवर्ण पदक, सांघिक स्प्रिंट, स्क्रॅच रेस, कॅरीन प्रकारात रौप्यपदक पटकावले. दिल्ली येथे झालेल्या एशियन चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताकडून टीम इव्हेंट या प्रकारात रौप्यपदक, वैयक्तिक परशुट प्रकारात कास्यपदक मिळवले. या खेळात भारत देशात हे पदक मिळवणारी ती पहिली ठरली आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या जागतिकस्तराच्या ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे. संस्थेचे चेअरमन अरुणराव खंजिरे, मुख्याध्यापक एस.ए. पाटील यांच्याहस्ते तिचा गौरव केला.
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02443 Txt Kopdist Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..