भरदिवसा घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भरदिवसा घरफोडी
भरदिवसा घरफोडी

भरदिवसा घरफोडी

sakal_logo
By

तारदाळात भरदिवसा घरफोडी
कुलुप तोडून कृत्य; १ लाख ३८ हजारांचा ऐवज पळविला
इचलकरंजी, ता. ९ : घराला कुलूप लावून आख्खे कुटुंबच हाकेच्या अंतरावर रक्षाविसर्जनच्या कार्यक्रमला गेले. याचा फायदा उठवत चोरट्याने भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून धाडसी चोरी केली. सुमारे तीन तोळे सोने, चांदी, रोकड असा एकूण १ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमालावर चोरट्याने डल्ला मारला. ही घटना आज दुपारी बाराच्या सुमारास तारदाळ (ता. हातकणंगले) येथील मुकुंद नगर भागात उघडकीस आली. याबाबतची फिर्याद सुधीर जालंदर खांडेकर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सुधीर खांडेकर तारदाळ येथील मुकुंद नगर भागात राहतात. ते कुटुंबासह गावातच आज सकाळी साडेनऊच्या सुमारास रक्षाविसर्जनाच्या कार्यक्रमाला गेले.दोन तासात घरी यायचे म्हणून केवळ घराला कुलूप लावून गेले. मात्र याचा फायदा उठवत चोरट्याने भरदिवसा घर फोडले. घरातील मौल्यवान वस्तूंचे कपाट लॉक नसल्याने चोरट्याला आणखी फावले. सोन्याचे गंठण, अंगठी, कर्णफुले असे सुमारे तीन तोळे दागिने, रोख १३ हजार रुपये आणि नाणी, पंचार्त्या, मेकला, छल्ला असे १० हजार रुपयांचे चांदीचे दागिने चोरीला गेले. खांडेकर अवघ्या अडीच तासानंतर बाराच्या सुमारास घरी परतले असता कुलूप तोडून कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने,रोख रक्कम चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. १ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद खांडेकर यांनी शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे.याप्रकरणी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02476 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..