माधव विद्या मंदिरमध्ये वनसंवर्धन दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माधव विद्या मंदिरमध्ये वनसंवर्धन दिन
माधव विद्या मंदिरमध्ये वनसंवर्धन दिन

माधव विद्या मंदिरमध्ये वनसंवर्धन दिन

sakal_logo
By

04197
माधव विद्यामंदिरमध्ये वनसंवर्धन दिन
इचलकरंजी : माधव विद्यामंदिर येथे ग्रीन इचलकरंजीच्या सहकार्याने वनसंवर्धन दिन साजरा केला. ग्रीन इचलकरंजी या पर्यावरण विषयात काम करणाऱ्या संस्थेने झाडांबद्दल व बियांपासून रोपे कशी करायची याबद्दल मार्गदर्शन केले. तिसरी ते सहावीच्या सुमारे १६० विद्यार्थ्यांना करंज, गुंज, मायाळू, चिंच, खजूर आदी झाडांच्या बिया दिल्या. तसेच त्याची माहिती सांगून रोपे कसे लावायची याची माहिती दिली. विद्यार्थ्यांनी घरातून दुधाच्या रिकाम्या पिशव्या आणल्या होत्या. त्यामध्ये माती, गांडूळ खत व बिया घालून रोपे लावली. अंकुश गरगटे व योगेश सुतार यांनी मुलांना माहिती दिली. श्री. बने, श्री. बरागडे आदी उपस्थित होते.
- - - - - - - - - - -
04196
सुलतानपुरे विद्यामंदिरमध्ये आरोग्य शिबिर
इचलकरंजी : लायन्स क्लबमार्फत सुलतानपुरे विद्यामंदिरमध्ये आरोग्य शिबिर झाले. हेल्दी स्कूल उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. स्वागत व प्रास्ताविक सौ. माया थोरात यांनी केले. बालरोगतज्‍ज्ञ डॉ. शोएब मोमीन यांनी विद्यार्थ्यांची चिकित्सकपणे आरोग्य तपासणी केली. विद्यार्थ्यांना सकस आहाराचे महत्त्‍व सांगितले. पावसाळ्यात लहान मुलांनी घ्यायची काळजी याविषयीचे माहिती पत्रक मुलांना वाटप केले. लायन्सचे प्रेसिडेंट महेंद्र बालर यांचा सत्कार स्कूल कमिटीच्या अध्यक्षा सौ. हेमल सुलतानपुरे यांनी व डॉ. शोएब मोमीन यांचा सत्कार किशोर पाटील यांनी केला. उपक्रमासाठी सचिव सुभाष तोष्णीवाल, खजिनदार संदीप सुतार, सचिन येलाजा, नंदकुमार बांगड, संदीप शिवगण, सविता कांबळे व शाहीन मुल्ला यांचे सहकार्य लाभले. स्कूल कमिटीच्या उपाध्यक्षा सौ. रोहिणी शहापुरे, संचालिका सौ. शैलजा पाटील, अशोक चनविरे, मुख्याध्यापक श्री. वळगडे उपस्थित होते.
- - - - - - -
शिरढोणमध्ये शाळा दुरुस्तीसाठी देणगी
इचलकरंजी : माजी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी एका दिवसात चार लाख रुपयांची देणगी शाळेच्या दुरुस्तीसाठी दिली. यातून गावचे गावातील शाळेवर किती प्रेम आहे हे दिसून येते. शाळेप्रती असाच जिव्हाळा कायम राहू दे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागीय अधिकारी विनयकुमार हनशी यांनी केले. शिरढोण (ता. शिरोळ) येथील रमजानशेठ बाणदार विद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विक्रांत पाटील-किणीकर होते. मुख्याध्यापक व्ही. के. सोनवणे यांनी स्वागत केले. अविनाश पाटील यांनी प्रास्ताविक केले. विक्रांत पाटील, डॉ. कुमार पाटील, विकास कांबळे, प्रशांत कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच बाबासो हेरवाडे, उपसरपंच रेश्मा चौधरी, पोलिसपाटील अनुराधा रुबाब शेख आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन रेखा गायकवाड यांनी केले. आभार नंदकुमार रुकडे यांनी मानले.
- - - - - - - -
गिरीश चितळे यांची भेट
इचलकरंजी : जायंट्‌स वेल्फेअर फौंडेशनचे अध्यक्ष गिरीश चितळे यांनी जायंट्‌स ग्रुप ऑफ उत्कर्षा सहेली शहापूर येथे सदिच्छा भेट दिली. चितळे आणि केंद्रीय समिती सदस्य डॉ. अनिल माळी यांनी उत्कर्षा सहेली ग्रुपची माहिती घेऊन सामाजिक उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले. राजश्री माने यांनी स्वागत केले. केंद्रीय समितीचे सचिव स्नेहल कुलकर्णी, युनिट डायरेक्टर सुनीता शेरीकर, सायली नेमिष्टे, संगीता नेमिष्टे, रजनी शिंदे, तन्वी नेमिष्टे, वंदना गायकवाड, अमिता बिरंजे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02546 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..