कन्या महाविद्यालयात महिलांसाठी आरोग्य शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कन्या महाविद्यालयात महिलांसाठी आरोग्य शिबीर
कन्या महाविद्यालयात महिलांसाठी आरोग्य शिबीर

कन्या महाविद्यालयात महिलांसाठी आरोग्य शिबीर

sakal_logo
By

कन्या महाविद्यालयात महिलांसाठी आरोग्य शिबीर
इचलकरंजी, ता. २५ : श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात होप कर्करोग डिटेक्शन अभियानाअंतर्गत महिलांसाठी आरोग्य शिबीर घेतले. येथील रोटरी क्लब सेन्ट्रल अँन्स कमिटी, रोटरी क्लब अतिग्रे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा, महाविद्यालयाच्या एनसीसी, एनएसएस, महिला सबलीकरण आणि शाळा सिद्धी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिबीराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्‍घाटन प्राचार्या प्रो. डॉ. त्रिशला कदम यांच्याहस्ते झाले.
शिबिरात कर्करोगाची लक्षणे, उपचार पद्धती आणि त्यासंबंधी इतर महत्वाच्या तपासण्या केल्या. विशेषतः महिलांसंदर्भात आढळून येणाऱ्या स्तनांच्या कर्करोगाची लक्षणे, गर्भाशय व बीजकोष कर्करोगाची लक्षणे याबाबत मार्गदर्शन केले. ४१ महिलांनी संपूर्ण आरोग्य तपासणी करून घेतली. त्यामधील दोन महिलांना कर्करोगाचे निदान झाले. त्यावर योग्य उपचार वेळीच घेतले तर कर्करोग निश्चितच बरा होऊ शकतो, म्हणून या दोन्ही महिलांच्या उपचाराची जबाबदारी कोल्हापूर कॅन्सर सेंटरने घेतली आहे. अँन्स कमिटीच्या चेअरमन दिलशाद मुजावर, यास्मिन मणेर, संजय देमान्ना, अशोक जैन,ऋषी खोत, रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल डॉ. प्रशांत कांबळे, प्रशांत गुरव यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02548 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..