
झाड कोसळून नुकसान
४२४०
इचलकरंजीला वादळी पावसाचा तडाखा
वीज वाहिन्या तुटल्याने शहरभर अंधारात; झाड कोसळल्याने वाहनांचा नुकसान
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. २९ : शहरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शहर अंधारात गडप झाले. कोल्हापूर मार्गावर एएससी कॉलेजनजीक झाड रस्त्यावरच उन्मळून पडल्याने वाहतूक ठप्प झाली. झाडाखाली सापडून सहवास कट्टा, चारचाकी वाहन, मोटारसायकल व सायकलीचे नुकसान झाले असून दोघे किरकोळ जखमी झाले. समाजवादी प्रबोधनी व कन्या कॉलेजमार्गे या मार्गावरील वाहतूक वळवली. भगतसिंग उद्यान परिसर, शिवतीर्थ परिसर, पारीक कॉलनी परिसरातही झाडे उन्मळून पडली. वाहतूक पोलिस आणि महानगरपालिकेने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
काही दिवसांपासून पावसाचा जोर थांबला आहे. आज दिवसभर उन्हाचा झळा सहन कराव्या लागल्या. रात्री आठच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यायामुळे मध्यवर्ती छत्रपती शाहू महाराज पुतळा ते एएससी कॉलेज या मुख्य रस्त्यावरील भलेमोठे झाड रस्त्यावरच उन्मळून पडले. यामध्ये चारचाकी, मोटारसायकल, सायकलचे नुकसान झाले. दोघे किरकोळ जखमी झाले. घटनेत सहवास कट्ट्याचे नुकसान झाले. भले मोठे झाड उन्मळून पडल्याने परिसरातील विजेच्या तारा, सीसीटीव्ही वायर, खासगी केबल तुटल्या. रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी झाली. अग्निशामक दल, महानगरपालिकेची आपत्कालीन व्यवस्था, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे कर्मचारी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. वादळी वाऱ्यायासह आलेला पाऊस काही भागात मोठ्या प्रमाणात कोसळला तर काही भागात तुरळक प्रमाणात पडला. रात्री उशिरापर्यंत विद्युतपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे कर्मचारी काम करत होते.
घुणकीतही वळीव
घुणकी ः सकाळी धुके, दिवसभर उकाडा आणि रात्री काळेकुट्ट ढग जमा होऊन वळीव स्वरूपात पावसाने हजेरी लावली. या विचित्र योगायोगाची या परिसरात चर्चा होती. पहाटे पडणाऱ्या धुक्याची धुक्याची चर्चा सुरू असतानाच दुपारी अकरा ते सायंकाळी सहापर्यंत कडक उन्हाचा अनुभव घेतला. अक्षरशः लोक हैराण झाले. रात्री सातनंतर वळीवसदृश पाऊस झाला.
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02570 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..