आयुक्त गैरप्रकार रोखला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयुक्त गैरप्रकार रोखला
आयुक्त गैरप्रकार रोखला

आयुक्त गैरप्रकार रोखला

sakal_logo
By

इचलकरंजीतील महापालिका शाळेत
गैरप्रकार करणाऱ्या अल्पवयीनांवर कारवाई
इचलकरंजी : महापालिका शाळांच्या इमारतीत हुल्लडबाज तरुणांकडून होणाऱ्या गैरप्रकाराच्या तक्रारी येताच प्रशासक सुधाकर देशमुख यांनी आज अचानक शाळा क्र. १२ ला भेट दिली. यावेळी नशा करणाऱ्या चार मुलांवर कारवाईच्या सूचना पोलिस प्रशासनाला दिल्या. पोलिसांनी चौघांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. महापालिकेच्या महात्मा जोतिबा फुले शाळा क्र. १२ ला आज प्रशासक सुधाकर देशमुख यांनी अचानक भेट दिली. शाळा परिसरात चार मुले गैरप्रकार करताना निदर्शनास आली. त्यांनी गावभाग पोलिस ठाण्याशी संपर्क साधून कारवाईच्या सूचना केली. तसेच शाळा परिसरात गैरप्रकार करू नयेत. तसे आढळल्यास संबंधितावर कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला. दरम्यान गावभाग पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले. संशयित अल्पवयीनांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून दिले आहे. दरम्यान हुल्लडबाज तरुण शाळा परिसरात गांजा सेवन करत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे केल्या.

40114
धरणगुत्तीच्या चोरट्यास अटक
शिरोळ ः नांदणी नाका येथील लमाने वसाहतीमधील घरफोडी उघडकीस आणण्यात शिरोळ पोलिसांना यश आले. अजित रमेश जाधव (वय २७, लक्ष्मीनगर धरणगुत्ती) असे संशयित चोरट्याचे नाव आहे. १५ एप्रिललादुपारी साडेबाराच्या दरम्यान लमाने वसाहतीमधील घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने व मोबाईल चोरट्याने लंपास केले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरिगडे यांच्या नेतृत्वाखालील ज्ञानेश्वर सानप, ताहीर मुल्ला, प्रदीप कुंभार, रहमान शेख, संजय राठोड यांच्या पथकाने तपास केला. तपासात अजित जाधव याचा संबंध असल्याचे उघड झाल्याने सापळा रचून जयसिंगपूर येथील शाहूनगरातून जाधव यास चोरीतील मोबाईलसह अटक केली.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02580 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top