पोक्सो अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोक्सो अटक
पोक्सो अटक

पोक्सो अटक

sakal_logo
By

अल्पवयीन मुलीकडून
उकळली १३ हजार खंडणी
इचलकरंजीत प्रकार; पोक्सोंतर्गत तरुणाला अटक

इचलकरंजी, ता. २ : सोशल मीडिया वर फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीकडून १३ हजारांची खंडणी उकळणाऱ्या महाविद्यालयीन तरुणावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. चिन्मय गिरीश कुलकर्णी (वय २० रा. जवाहरनर) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर पोक्सोअंतर्गतही गुन्हा दाखल झाला आहे. पीडित मुलीला दोन महिन्यांपासून त्रास देत त्याने मुलीच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. पोलिसांनी रात्री उशीरा त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जवाहरनगर परिसरात चिन्मय कुलकर्णी राहण्यास आहे. तो शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. ओळखीच्या माध्यमातून त्याने मुलीसोबत संपर्क केला. दोघांमध्ये मोबाईलवर सोशल मीडियावर चॅटिंग करत संवाद सुरू झाला. अशातच दोन महिन्यांपासून त्याने मुलीला त्रास देण्यास सुरुवात केली. पीडित मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि तिच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागण्यास सुरुवात केली. भीतीने मुलीने त्याला तीन हजार रुपये दिले. पुन्हा धमकी देऊ लागल्याने दुसऱ्यावेळी १० हजार रुपये दिले. त्याने पुन्हा एकदा १० हजार रुपयांची मागणी केल्याने पीडित मुलीने याबाबत कुटुंबियांना सांगितले. याप्रकरणी पीडित मुलीच्या वडीलांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार पोलिसांनी चिन्मयवर गुन्हा दाखल केला. अधिक तपास प्रभारी पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02588 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..