इचलकरंजी परिसरातील संक्षिप्त बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजी परिसरातील संक्षिप्त बातम्या
इचलकरंजी परिसरातील संक्षिप्त बातम्या

इचलकरंजी परिसरातील संक्षिप्त बातम्या

sakal_logo
By

40750
इचलकरंजी : डीकेटीईच्या जुनिअर कॉलेजच्या पालक सभेत बोलताना डॉ. सपना आवाडे.

डीकेटीई सोसायटीच्या
कॉलेजची पालक सभा उत्साहात
इचलकरंजी : डीकेटीई सोसायटीच्या ज्युनिअर कॉलेज विभागाची पालक सभा झाली. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात झालेल्या या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या मानद सचिव डॉ. सपना आवाडे होत्या. विद्यार्थ्यांनी संकुचित न राहता वैश्विक होऊन विचार करून अभ्यास करावा,असे मत सौ.आवाडे यांनी व्यक्त केले. प्रास्ताविकात प्राचार्या व्ही. एच. उपाध्ये यांनी कॉलेजची परंपरा, विद्यार्थी केंद्रित सुविधा यांसह उपक्रमाची माहिती दिली. उपप्राचार्य ए. बी. पाटील यांनी वार्षिक नियोजन सांगून विद्यार्थ्यांची कॉलेज शिस्त, अभ्यास याबाबत पालकांनी जागरुक राहण्याचे सांगितले. समुपदेशक डॉ. शेट्टी यांनी मार्गदर्शन केले. किल्लेदार यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
-------------
40751
इचलकरंजी : स्वामिनी महिला मंडळास भजन साहित्य प्रदान करताना माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे.

स्वामिनी मंडळास भजन साहित्य
इचलकरंजी : माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे यांनी स्वामिनी महिला मंडळास भजन साहित्य प्रदान केले. कोरोची (ता. हातकणंगले) येथे विठ्ठल मंदिरामध्ये भजन सेवा स्वामिनी महिला मंडळ देते. या मंडळास भजनासाठी लागणारी गरज ओळखून खोबरे यांनी भजन साहित्य दिले. या वेळी मंडळाच्या सदस्या विजया चव्हाण, रूपाली पवळे, वैशाली शिंदे, मेघा पवळे, रूपाली पवळे, वंदना उगळे, प्रभा जाधव, सरिता मोरे, मेघा सूर्यवंशी, साक्षी मोरे, भजन प्रशिक्षक सागर जोशी, तबला वादक सुधीर कुलकर्णी, सुरेश जाधव उपस्थित होते.
-------------
40748
इचलकरंजी : हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत पोलिस दल व लायन्स क्लबतर्फे ऑटोरिक्षा व भाडोत्री वाहनावर फलक लावण्यात आले.

हर घर तिरंगा अंतर्गत प्रबोधन
इचलकरंजी : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत इचलकरंजी पोलिस दल आणि लायन्स क्लबतर्फे माहितीचे फलक लावण्यात आले. पोलिस निरीक्षक राजू ताशीलदार, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक विकास अडसूळ यांचे हस्ते शहरातील आदर्श चालक, मालक संघटना, डॉ. आंबेडकर पुतळा चौक, छत्रपती शिवाजी महाराज रिवर्स स्टॉप, गांधी चौक ऑटोरिक्षा मित्र मंडळ, राजवाडा चौक ऑटोरिक्षा युवक मंडळ, कल्पवृक्ष ऑटोरिक्षा स्टॉप, संजय फौंड्री येथील ऑटोरिक्षा व भाडोत्री वाहनावर हे फलक लावण्यात आले. या वेळी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र बालर, संदीप सुतार, कृष्णा भराडीया, सचिन येलाजा, अमित पोतदार, गजानन शिरगांवेयांसह ऑटोरिक्षा संघटनेचे अध्यक्ष, चालक, मालक उपस्थित होते.
---------------
40749
राधानगरी : रोटरी क्लब इचलकरंजीने आडोलीतील मुलींना १८ सायकली वितरित केल्या.

रोटरीतर्फे सायकल वाटप
इचलकरंजी : येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी संस्थेने या शैक्षणिक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम व डोंगराळ परिसरात असणाऱ्या राधानगरी तालुक्यातील आडोली गावात मुलींसाठी आधार दिला. महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयातील मुली ८ ते १२ किलोमीटर अंतरावरून चालत शाळेसाठी येतात. या मुलींची गरज ओळखून रोटरी क्लबकडून १८ मुलींसाठी मोफत सायकली वितरीत केल्या. वाकीधोळ सारख्या दुर्गम व डोंगराळ परिसरात रोटरी क्लब पोहोचल्याने मुलींच्या शिक्षणाची सोय झाली. वाकीघोळ हा राधानगरी अभयारण्यमधील दुर्गम भागात बारा वाड्या आहेत. महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात विद्यार्थीनी दररोज पायपीट करत येतात. या १८ विद्यार्थीनींना सायकली देण्यात आल्या. याकरिता रोटरीचे सदस्य रविंद्र नाकिल, संजय खोत यांचे आर्थिक सहकार्य केले. रोटरीचे पदाधिकाऱ्यांनी डोंगरी दुर्गम भागातील आडोली गावी जाऊन सायकली वितरण केल्या. या वेळी रोटरीचे अध्यक्ष सत्यनारायण धूत, रवींद्र नाकिल, वसंत पाटील, प्रकाश रावळ, गुरूनाथ कुलकर्णी उपस्थित होते. मुख्याध्यापक विदयानंद पाटील यांनी स्वागत केले. संपत मोहिते आभार यांनी मानले.
--------------
माधव विद्यामंदिरात रेन वॉटर हार्वेस्टिंग
इचलकरंजी : येथील माधव विद्यामंदिरात रेन वॉटर हार्वेस्टिंग हा उपक्रम घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून संदीप चोडणकर यांची उपस्थिती होती. चोडणकर यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंग या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना पाण्याचे महत्त्‍व पटवून देत प्रात्यक्षिक दाखविले. पाण्याचे गणित सांगून रेन वॉटर हार्वेस्टिंग काळाची गरज असल्याचे पटवून दिले. या वेळी उपमुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
----------------
निखिल कागवाडेचे यश
इचलकरंजी : नामदेव समाजसेवा मंडळातर्फे आयोजित आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत दि. न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या निखिल कागवाडे याने यश मिळवले. मोठ्या गटात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक त्याने पटकावले. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, डॉ. भास्कर उरुणकर, डॉ. महेश महाडिक यांच्या हस्ते त्याला गौरविण्यात आले. त्याला मुख्याध्यापक एस. ए. पाटील, पर्यवेक्षक डी. ए. तराळ कलाशिक्षक पी. एस. कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02592 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..