कोरोचीतील महिलेचे जट निमुर्लन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोचीतील महिलेचे जट निमुर्लन
कोरोचीतील महिलेचे जट निमुर्लन

कोरोचीतील महिलेचे जट निमुर्लन

sakal_logo
By

04287

------
कोरोचीतील महिलेचे जटा निर्मूलन
अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे पुढाकार; सुनील स्वामींनी केले प्रबोधन
इचलकरंजी, ता. ५ : कोरोची (ता. हातकणंगले) येथील सिद्धार्थनगरमधील ४० वर्षीय महिलेचे जटा निर्मूलन करण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा इचलकरंजी-कोरोची यांच्या पुढाकाराने जटा निर्मूलन करण्यात आले. महाराष्ट्र अंनिसचे राज्य सांस्कृतिक विभाग कार्यवाह सुनील स्वामींनी प्रबोधन केल्याने ती स्त्री जटामुक्त होऊ शकली.
संबंधित महिला व तिच्या कुटुंबीयांशी काही दिवस स्वामी संवाद साधत होते. तिचे आणि तिच्या भावंडांचे प्रबोधन करून जटा निर्मूलनासाठी त्यांना तयार केले होते. महिलेचेही समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर महिलेने जटा काढून घेण्याची तयारी दर्शवली. कोरोचीचे पोलिस पाटील सावकार हेगडे यांच्या उपस्थितीत त्या महिलेला जटेतून मुक्त करण्यात आले. शरीराची, केसांची स्वच्छता न राखल्याने, काळजी न घेतल्याने केसांत गुंता निर्माण होऊन अशी जटा तयार होत असते. लोक मात्र ती देवीची देण असे समजून त्या जटेसमवेत जीवन जगतात; पण कोरोचीतील त्या महिलेशी साधलेल्या संवादातून असे लक्षात आले की, शारीरिक त्रासाबरोबरच या जटेमुळे मानसिक त्राससुद्धा होत असतो. सुनील स्वामींनी प्रबोधन केल्याने ती स्त्री जटामुक्त होऊ शकली.
यावेळी सुनील स्वामी, अमोल पाटील, रोहित दळवी, दामोदर कोळी, उत्तम साळुंखे, पोलिस पाटील सावकर हेगडे, सौ. माया धनवडे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02596 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..