
अपघात एक ठार
भरधाव टेंपोच्या धडकेत
हिंगणगावातील एक ठार
मित्र जखमी; रस्ता ओलांडताना हातकणंगलेनजीक अपघात
हातकणंगले, ता. ५ : सांगली -कोल्हापूर रस्ता ओलांडत असताना टेंपोच्या भरधाव धडकेत पादचारी जागीच ठार झाला. सलीम मिरासो शेख (वय ४० हिंगणगाव, ता. हातकणंगले) असे मृताचे नाव आहे. त्याचा मित्र शकील अब्दुल जमादार जखमी झाला आहे. अपघातानंतर टेंपोचालक पसार झाला आहे. लक्ष्मी इंडस्ट्रीजकडे जाणाऱ्या रस्त्यालगत अपघात आज रात्री साडेनऊ वाजता घडला. अपघाताची नोंद हातकणंगले पोलिसात रात्री उशिरा झाली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सलीम व त्याचा मित्र शकील कामानिमित्त कोल्हापूरला गेले होते. परत येताना जेवण करण्यासाठी साई मंदिरजवळ लक्ष्मी इंडस्ट्रीजकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असणाऱ्या हॉटेलमध्ये गेले होते. मात्र त्यांचा जेवणाचा बेत रद्द झाला आणि हॉटेलमधून बाहेर पडले. त्यांनी मोटारसायकल रस्त्याच्या विरुद्ध बाजूला उभी केली होती. मोटारसायकलकडे परत येण्यासाठी दुभाजक ओलांडताच कोल्हापूरहून येणाऱ्या भरधाव टेंपोने सलीमला जोराची धडक दिली. अपघातात तो उडून मित्र शकीलच्या अंगावर पडून रस्त्यावर पडला. त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो जागीच ठार झाला. शकील हा जखमी झाला आहे. तत्काळ सर्मपण संस्थेचे स्वप्नील नरुटे यांनी जखमी शकीलला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02598 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..