गणेश मंडळे बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणेश मंडळे बैठक
गणेश मंडळे बैठक

गणेश मंडळे बैठक

sakal_logo
By

शहापूर खणीत मूर्तींच्या
विसर्जनाला मंडळांचा विरोध

इचलकरंजी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्याचा निर्णय

इचलकरंजी,ता.६ : गणेशोत्सवात घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन शहापूर खणीतच करण्याच्या निर्णयाला शहर परिसरातील सार्वजनिक मंडळांचा विरोध आहे. त्यामुळे श्रींचे विसर्जन पंचगंगा नदीतच करण्यास परवानगी देण्याच्या मागणीसाठी सोमवारी (ता.८) आजी-माजी खासदार, आमदार आणि महापालिकेचे आयुक्तांना भेटून निवेदन देण्याचा निर्णय आज व्यंकोबा मैदानात झालेल्या बैठकीत झाला.

गणेशमूर्ती विसर्जन शहापूर खणीत करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला विरोध होत आहे. या पार्श्‍वभूमीवर व्यंकोबा मैदानात शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली . बैठकीत यंदा गणेशमूर्तींचे विसर्जन पंचगंगा नदीतच करण्याबाबत चर्चा झाली. दोन वर्षे कोरोनामुळे शहापूर खणीत मूर्ती विसर्जन केले. त्यावेळी परिस्थिती आणि प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिक आणि मंडळांनी सहकार्य केले. मात्र यावर्षीही प्रशासन शहापूर खणीतच विसर्जन करण्याची तयारी करत आहे. याबाबत बैठकीत मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी म्हणणे मांडले. महापालिकेचे आयुक्त, आजी-माजी खासदार व आमदार यांना भेटून निवेदन देण्याचा निर्णय झाला. त्यासाठी शहरातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकारी व सभासदांनी ८ रोजी सकाळी १० वाजता श्रीमंत घोरपडे नाट्यगृह चौकात उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
बैठकीस अमृत भोसले, मलकारी लवटे, शैलेश गोरे, अमरजित जाधव, रविंद्र लोहार, बंडू जोंग, अनिस म्हालदार, महावीर कोल्हापूरे, किशोर पाटील, सचिन माळी आदी मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02601 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top