इचलकरंजीत धान्यपुरवठा कोलमडला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीत धान्यपुरवठा कोलमडला
इचलकरंजीत धान्यपुरवठा कोलमडला

इचलकरंजीत धान्यपुरवठा कोलमडला

sakal_logo
By

04312
संग्रहित
---------------------
इचलकरंजीत धान्य पुरवठा कोलमडला

विस्कळीतपणामुळे रेशन दुकानदार, पुरवठा विभागाची कोंडी

ऋषीकेश राऊत : सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. ९ : कधी सर्व्हर डाऊन, मोफत धान्य नाही, तर कधी गहू नाही, तांदूळ आहे अशा कोलमडलेल्या मार्गाने धान्य पुरवठा शहरात होत आहे. सात दिवसांपासून हा पुरवठा पूर्णतः ढासळला असून नागरिकांच्या धान्यासाठी चकरावर चकरा वाढल्या आहेत. अचानक सर्व्हर डाऊनने लाभार्थ्यांना लांबलचक रांगेतूनच रिकाम्या हाताने घरी परतावे लागत आहे. धान्य पुरवठ्याच्या विस्कळीतपणामुळे रेशन दुकानदार, पुरवठा विभागाची कोंडी होत असून सर्वसामान्य कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
शहरात सुमारे १०३ धान्य दुकानदार आहेत. या दुकानांतून यापूर्वी प्रत्येक महिन्याचे धान्य मागील महिन्यातील महिनाअखेरपर्यंत दुकानात येऊन पडायचे. अशा सुरळीत नियोजनात पॉझ मशिनमुळे धान्य वाटपाचा गोंधळ सुरू झाला आहे. त्यात विविध समस्या धान्य वाटपात असताना शहरातून सुरळीत धान्य पुरवठा होणारे शासनाचे धान्य गोदाम बंद करण्यात आले. त्यामुळे मार्चपासून रेशन दुकानदारांसह लाभार्थ्यांना याला तोंड द्यावे लागत आहे. आता गेल्या महिन्यापासून वेळेवर धान्य नाही आणि सर्व्हर डाऊनमुळे धान्य वाटप करणे दुकानदारांसाठी डोकेदुखी ठरत आहे. लाभार्थ्यांचा रेशन दुकानात आणि पुरवठा विभागात गोंधळ नित्याचा झाला आहे.
दोन महिन्यांपासून शहरातील रेशन दुकानातून होणाऱ्या धान्य पुरवठ्याने अक्षरशः रेशन कार्डधारकांना वेठीस धरले आहे. प्रत्येक महिन्याचे धान्य त्याच महिन्यात वाटप झाले आहे. असे एकही दुकान शोधून सापडणार नाही, असे चित्र आहे. धान्य घेण्यासाठी सध्या दोन-तीन वेळा दुकानात जावे लागत आहे. मोफत, प्राधान्य, अंत्योदय, अन्न सुरक्षा योजना आदींमुळे धान्य पुरवठ्याचा ताळमेळ बसत नाही. धान्याच्या नियमित पुरवठ्यासाठी रेशन दुकाने, लाभार्थ्यांना विलंबच करावा लागत आहे.
- - - - - - -
मोफत धान्याचा पत्ता नाही
काही रेशन दुकानांत महिन्या महिन्याला मोफत धान्य येण्यास विलंब होत आहे. अनेक दुकानांत मोफत धान्याचा लाभ लाभार्थ्यांना मिळत नाही. केंद्र शासनाने मोफत धान्याचा कालावधी वाढवला; मात्र वेळच्या वेळी ते लाभार्थ्यांच्या पदरात पडत नाही. कोलमडलेल्या धान्य पुरवठ्यात मोफत धान्याचा पत्ता हरवत असल्याचा दिसत आहे.
- - - - - - - - - -

इतक्या समस्या वाढल्या आहेत की, नेमके धान्य वाटपाबाबत रेशन दुकानदारांनाच समजणे अवघड झाले आहे. एकाच वेळी मागील महिन्यातील आणि चालू महिन्याचे धान्य वाटप करावे लागत आहे. सर्व्हरने दुकानदारांना तर घाईला आणले आहे. पुरवठा विभागाने यावर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
-अन्वर मोमीन, धान्य दुकानदार.
- - - - -
रेशनच्या समस्या वाढल्या असून सर्वच कामे ठप्प झाली आहेत. लाभार्थ्यांच्या दुकानदारांना आणि दुकानदारांच्या पुरवठा विभागाकडे याबाबत तक्रारी येतच आहेत. सर्व समस्या सोडवण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठपुरावा केला जात आहे.
-अमित डोंगरे, पुरवठा निरीक्षण अधिकारी.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02610 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..