इचलकरंजी परिसरात रक्षाबंधन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजी परिसरात रक्षाबंधन उत्साहात
इचलकरंजी परिसरात रक्षाबंधन उत्साहात

इचलकरंजी परिसरात रक्षाबंधन उत्साहात

sakal_logo
By

04332

04331

----
इचलकरंजी परिसरात रक्षाबंधन उत्साहात
सैनिक, पोलिसांनाही बांधल्या राख्या; पोस्टाद्वारे ३८०० राख्यांचे वितरण
इचलकरंजी, ता. ११ : बहीण-भावाच्या अतुट नाते अधिक दृढ करत घरोघरी रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा झाला. रक्षाबंधनानिमित्त परगावाहून बहिणी आज माहेरी आल्या. अनेकांनी परगावी, परदेशात राख्या पाठवून भावांना शुभेच्छा दिल्या. बहिणींनी औक्षण केल्यानंतर भावांनी झक्कास गिफ्ट देत बहिणींना खूश केले. काही ठिकाणी सामाजिक बांधिलकी जपत सैनिक, पोलिस कर्मचारी यांना राख्या बांधत आपुलकीचा बंध जोडला गेला. तसेच कुटुंबापासून दुरावलेल्यांच्या आयुष्यात मायेचा ओलावा आणणाऱ्या शहर व परिसरातील संस्थांमध्येही रक्षाबंधन उत्साहात झाले. चार दिवसांत पोस्टाद्वारे ३८०० राख्यांचे वितरण केले.
सकाळपासूनच राख्या आणि गिफ्टच्या खरेदीसाठी शहरातील बाजारपेठा गजबजल्या होत्या. भेटवस्तूंबरोबरच चॉकलेट्स, मिठाई तसेच गोड पदार्थांचीही मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली. परंपरेनुसार शहरात घरोघरी रक्षाबंधनाचा सण साजरा होत असतानाच विविध संघटनांनीही सण उत्साहात साजरा केला.
ऑनलाईन रक्षाबंधनाचा बंध अनेकांनी जपला. परदेशात असलेल्या बहिणी तसेच भावांना आनंद लुटण्यासाठी मायदेशी येता न आल्याने अनेकांनी ऑनलाईन राखीपौर्णिमा साजरी केली. अनेक सोशल साईटवर एकमेकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा अन् ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्समार्फत पाठवलेले गिफ्ट, राख्या यांचीही यंदा चलती होती. पोस्टाने यंदाही बहिणींच्या राख्या भावांपर्यंत पोहचवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली. गेल्या चार दिवसात ३८०० राख्या भावांपर्यंत पोहोचवल्या.

* डीकेएएससी महाविद्यालय
एनसीसी विभागामार्फत रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित केला. मुलींनी एनसीसी मुलांना राख्या बांधून बहीण भावंडाचे नाते जपण्याचा प्रयत्न केला. प्राचार्य डॉ. अनिल पाटील उपस्थित होते. त्यांनाही एनसीसीच्या मुलींनी राखी बांधून बहिणीचे प्रेम व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. मेजर मोहन विरकर यांनी केले. प्रा. अरुण कटकुळे, प्रा. प्रशांत कांबळे उपस्थित होते.

* व्यंकोबा कुस्ती मैदान
महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरून आलेल्या अनेक पैलवानांच्या मनगटावर राखी बांधली. रक्षाबंधनासारख्या सणाला प्रत्येक पैलवानास आपल्या घरी जाता येत नाही. अशावेळी उपमहाराष्ट्रकेसरी पैलवान अमृत भोसले यांच्या कन्या अनुष्का व तनिष्का या दोघींनी व्यंकोबा मैदानातील प्रत्येक लहान-मोठ्या पैलवानास राखी बांधून रक्षाबंधन साजरा केला. पैलवान सूरज मगदूम, सतीश सूर्यवंशी उपस्थित होते.
- - - - - - -
एसटी स्टँडही गजबजले
रक्षाबंधनासाठी माहेरी जाणाऱ्या महिला, परगावाहून येणारे भाऊ, आपापल्या घरी जाणारे विद्यार्थी यांनी शहरातील सर्वच एसटी स्टँड्स गजबजलेले होते. रक्षाबंधनासाठी एसटी अगाराने जादा गाड्यांचे नियोजन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02620 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..