गणपती सजावटीत फेटा, धोतराची क्रेझ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गणपती सजावटीत फेटा, धोतराची क्रेझ
गणपती सजावटीत फेटा, धोतराची क्रेझ

गणपती सजावटीत फेटा, धोतराची क्रेझ

sakal_logo
By

04413

--------
गणपती सजावटीत फेटा, धोतराची क्रेझ

इचलकरंजी, ता.३० : गेल्या काही वर्षांत गणपतीच्या सजावटीत लक्षवेधी बदल होत असताना यंदा शहरात फेटा, धोतराची क्रेझ वाढली आहे. या वस्त्रांना विशेष महत्त्व प्राप्त झाले असून गणपतीला सुरेख रंग आणि नक्षी असलेली वस्त्रे नेसवण्यात तरुणाई अग्रेसर आहे. या कामात मान आणि धन दोन्ही मिळत असल्याने कलाकार यंदा सुखावला आहे.
घरगुती गणेशमूर्तींच्या सजावटीत गणेशभक्त गुंतले आहेत. यंदा श्रीमूर्तीला फेटा बांधण्याची क्रेझ वाढली आहे. दोन फुटांपासून पाच फुटांपर्यंतच्या मूर्तींना फेटा बांधून घेण्याचे प्रमाण शहरात वाढले आहे. यासाठी पुणेरी, कोल्हापूर, मावळे व श्री कृष्ण यासह नानाविध पद्धतीत फेटा बांधला जात आहे. यावर्षी शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमात शिकणारी तरुणाई काम करत आहेत. लहान गणेश मूर्तीला फेटा बांधण्यासाठी उंचीनुसार पैसे घेतले जात आहेत. तरुणाई यावर्षी सुंदर रंग आणि सुबक नक्षीकाम असलेली फेटे, धोतर नेसवण्यात रमली आहे. हा एक व्यवसाय असून यात अनेक तरुण कार्यरत आहेत.
मूर्तीच्या रंगानुसार फेटा, धोतराची डिझाईन केली जात आहे. फेट्याचा ट्रेंड काहीसा रुळला असला तरी धोतर डिझायनिंगचा हा ट्रेण्ड काहीसा नवीन आहे. कलाकार तरुणाई यामध्ये नाविन्यता जपत आहे. सॅटिन, गोल्डकॉइन आणि ब्रोकेड हे फॅब्रिक धोतरासाठी सर्रास वापरले जात आहे. त्यातही १५ ते २० शेड्स असतात. शालीचे व्यवस्थापन हाही एक गमतीशीर भाग असून धोतराच्या लेसच्या रंगांनुसार शाल चढवली जाते. दोन वर्षंपासून या क्षेत्रात दरवर्षी तरुणांची संख्या वाढत असून त्यात वेगळेपणाही दिसत आहे. धोतर, फेटे डिझाईन करणे आणि नेसवणे या कामात टिकणे सहज शक्य नसताना अनेक तरुण हा हंगामी व्यवसाय नेटाने करत आहेत.
------------
मोठ्या गणेशूर्तींनाही मागणी
घरगुती गणेशमूर्तीबरोबर यंदा मोठ्या प्रमाणात मोठमोठय़ा मंडळांची कामही मिळत तरुणांना मिळत आहे. मोठ्या मंडळांसाठी हे काम करताना कलेचे समाधानही मिळत असून आर्थिक मोबदलाही चांगला मिळत आहे. मोठ्या गणेशमुर्तीसाठी हे काम अत्यंत सर्जनशील तितकेच आव्हानात्मक आहे. मात्र आवडत्या अशा या कामात तरुणाई मोठ्या प्रमाणात रमलेली दिसत आहे.
----------------
या कामातून दिवसागणिक हजारो रुपये मिळत आहेत. मूर्तीची उंची किती आहे, यावर मानधन ठरते. गेल्या दोन वर्षात काम कमी होते. मात्र यावर्षी प्रत्येक स्टॉलवर सर्रासपणे फेटा, धोतराची मागणी वाढली आहे. त्यात मंडळांची मागणी वाढल्याने कामाचा ताण मोठा आहे.
ओंकार शिरगुप्पे, तरुण कलाकार

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02672 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..