पान ३ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ३
पान ३

पान ३

sakal_logo
By

इचलकरंजीतून १४० जण हद्दपार
इचलकरंजी, ता. ३१ : गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर इचलकरंजी पोलिस दलाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत.
कलम १४४ नुसार शहर आणि परिसरातील तब्बल १४० गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना १० दिवसांसाठी शहरातून हद्दपार केले आहे. तसेच ३०० जणांकडून शांतता व चांगल्या वर्तणुकीचे बॉँड लिहून घेतले आहेत, अशी माहिती पोलिस उपाधीक्षक बाबूराव महामुनी यांनी दिली. गणेश उतत्सव कालावधीत शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाकडून कडक उपाययोजना राबवल्या जाात आहेत. शहरावर पोलिसांचे सीसीटीव्ही आणि पेट्रोलिंग पथकाच्या माध्यमातून लक्ष असणार आहे. एकूण २० पोलिस अधिकारी, २०० पोलिस अमलदार, २५० होमगार्ड, राज्य राखीव पोलिस दल १ पथक व दंगा नियंत्रण पथक आदी पोलिस बंदोबस्त तैनात आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि नागरिकांनी गणेश उत्सव उत्साहात व आनंदात साजरा करावा, प्रशासनाकडून दिलेले नियम व अटी पाळून इतरांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहनही श्री. महामुनी यांनी केले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02685 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..