संविधानाच्या मूल्यांनी गणपती सजावट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संविधानाच्या मूल्यांनी गणपती सजावट
संविधानाच्या मूल्यांनी गणपती सजावट

संविधानाच्या मूल्यांनी गणपती सजावट

sakal_logo
By

04441

---------
संविधानाच्या मूल्यांनी गणपती सजावट
इचलकरंजीतील जवाहरनगरमधील तरुणींकडून हर घर संविधानाचा संदेश
इचलकरंजी, ता.१ : यंदा दोन वर्षानंतर गणरायाच्या आगमनाने तरुणाईच्या उत्साहाला उधाण आले आहे. त्यामुळे तरुणाई विविध प्रकारे जल्लोष साजरा करताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे विवेकी तरुणाई गणेशोत्सवाच्या मुळ हेतूला जपत समाज प्रबोधन जागवत आहे. जवाहरनगरमध्ये राहणाऱ्या राष्ट्र सेवा दलाची युवती प्रमुख स्नेहल माळी हिने घर हर संविधानाचा संदेश देत घरगुती गणरायाची सजावट संविधानाच्या मूल्यांनी सजवले आहे. भारतीय संविधानाची प्रतही गणेशभक्तांना पहायला मिळावी म्हणून ठेवली आहे. ही संविधानाची सजावट गणेशोत्सवाला राष्ट्रीय शिक्षण प्रबोधनाची झालर लावणारी ठरली आहे.
स्नेहल ही राष्ट्र सेवा दलात सक्रिय कार्य करणारी तरुणी. सण असो वा उत्सव आपल्या कृतीतून समाजाला विधायक संदेश देण्यासाठी ती कधीही मागे राहिली नाही. तिने वडिलांच्या वर्षश्राद्धाला कर्मकांडाला फाटा देत सांत्वनासाठी आलेल्या व्यक्तींना झाडे देण्याचे विधायक काम केले. अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाला हर घर तिरंगा बरोबर हर घर संविधानाची जनजागृती केली. आणि आता घरातील गणपतीसाठी देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या विषयाला घेवून हर घर संविधान या विषयावरील सजावट केली आहे. यामध्ये संविधानिक मुल्यांची आणि भारतीय संविधानाची प्रत गणेशभक्तांना ठेवली आहे. ही विधायक सजावट तिच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेत आहे.
भारतीयांना आजही संविधानाचे मोल फारसे कळलेले नाही. संविधान, संविधानिक मूल्ये नागरिकांनी समजून घेतली पाहिजेत आणि रोजच्या जगण्यात उतरवली पाहिजेत, या हेतूने तिने यंदा घरगुती बाप्पाची संविधानाच्या मुल्यांनी सजावट केली. संविधानाने दिलेले अधिकार, मूल्ये यांचे दर्शन तिने सजावटीतून घडवले आहे. याआधी तिने आपल्या साथींसह माणगावमधील लोकप्रतिनिधींचा ''हर घर संविधान'' या अभियानाबद्दल पुस्तके देवून सत्कारही केला. गणेशोत्सवात समाजप्रबोधनाचे सामाजिक प्रबोधनात्मक कार्यक्रम ती करणार आहे. यासाठी तिला संजय रेंदाळकर, इंद्रायणी पाटील, अमोल पाटील दामोदर कोळी, रोहित दळवी, सौरभ पोवार आदिंचे मार्गदर्शन लाभले आहे.
-------
घरगुती गणेश उत्सवात जवळचे पाहुणे मंडळी आणि शेजारी घरी येत असतात. आपण बाहेर जगाच प्रबोधन करत असतो. पण शेजारी आणि पाहुणे मंडळी यांनाही याविषयी प्रबोधन व्हावे यासाठी मी माझ्या घरच्या गणपतीची सजावट संविधानिक मूल्यांच्या मांडणीची केली आहे.
-स्नेहल माळी, तरुणी

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02688 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..