कार्यालय बंदमुळे पेन्शनधारक ताटकळत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कार्यालय बंदमुळे पेन्शनधारक ताटकळत
कार्यालय बंदमुळे पेन्शनधारक ताटकळत

कार्यालय बंदमुळे पेन्शनधारक ताटकळत

sakal_logo
By

04443
-------------
कार्यालय बंदमुळे पेन्शनधारक ताटकळत
इचलकरंजी, ता.१ : येथील संजय गांधी योजनेचे कार्यालय वेळेवर उघडले जात नसल्याच्या तक्रारी वाढत असताना पेन्शनधारक लाभार्थ्यांना आज कार्यालय वेळेत न उघडल्याने ताटकळत थांबावे लागले. कामगार नेते मिश्रीलाल जाजुही कार्यालयासमोर पोहोचले. कार्यालय उघडे नसल्याने अधिकारी, कर्मचारी वेळेवर उपस्थित राहत नसल्याची तक्रार प्रांताधिकारी, अप्पर तहसिलदारांकडे केली. अखेर साडेअकरा वाजण्याच्या सुमारास कार्यालयाचा दरवाजा उघडला आणि ताटकळत बसलेल्या नागरिकानी समाधान व्यक्त केले.
विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी येथील संजय गांधी योजनेच्या कार्यालयात नागरीकांना हेलपाटे मारावे लागतात. पावणेदहा वाजता कार्यालय उघडणे बंधनकारक असले तरी अनेकवेळा संजय गांधी योजनेचे कार्यालय अकरा वाजले तरी उघडलेले नसते. त्यामुळे नागरिकांना अधिकारी, कर्मचाऱ्‍यांची वाट पहात ताटकळत या कार्यालयासमोर थांबावे लागते. याची प्रचिती आज शेकडो नागरिकांना आली. विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना ताटकळत थांबावे लागले. अकरा वाजले तरी कार्यालय उघडले नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. कामगार नेते मिश्रीलाल जाजु यांनीही संजय गांधी योजनेचे कार्यालय गाठले. यावेळी अनेक नागरीक कार्यालय उघडण्याची वाट पहात थांबले होते. त्यामुळे जाजु यांनी प्रांताधिकारी, अप्पर तहसिलदार यांच्याशी संपर्क साधून कार्यालय वेळेवर उघडण्याची मागणी केली. आजारी असल्याने कार्यालयात येवू शकलो नाही. मात्र इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कार्यालय वेळेत उघडणे अपेक्षित होते. याबाबत चौकशी केली जाईल असे, पुरवठा निरीक्षण अधिकारी अमित डोंगरे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02689 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..