टुडे २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे २
टुडे २

टुडे २

sakal_logo
By

47474


इचलकरंजी : गौरीच्या आगमनाला उत्साहात महिलांनी झिम्मा-फुगडीचा ठेका धरत आनंद लुटला.(पद्माकर खुरपे: सकाळ छायाचित्रसेवा)

वस्त्रनगरीत गौराईचे
पारंपरिक उत्साहात स्वागत

इचलकरंजी, ता. ३ : हळदी-कुंकवाच्या पायघड्यांवरून सुख-समृद्धीच्या पावलांनी आलेल्या गौराईचे घरोघरी उत्साहात स्वागत झाले.
गौराईला वाजत-गाजत उत्साहात घरी आणून स्थापना केली आणि भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखवला. आज सकाळपासूनच गौरी आगमनाची सुरूवात शहरात झाली. आता तीन दिवस राहणाऱ्या या गौरींच्या सरबराईत कोणतीही कमी राहू नये, यासाठी महिला राबत होत्या.
गणरायाच्या आगमनानंतर सर्वत्र गौरींच्या आगमनाची चाहूल लागली होती. यासाठी महिला काही दिवसांपासून विविध कामात मग्न होत्या. त्यामुळे शनिवारी महिला सकाळपासूनच गौरींच्या स्वागतासाठी आतूर होत्या. गौराईचे पारंपरिक पद्धतीने आणि सोनपावलांनी आगमन झाल्यानंतर महिलांच्या उत्साहाला उधाण आले. गौरीला सजविण्यासाठी, तिला साजशृंगार करण्यासाठी महिलांनी विशेष परिश्रम घेतले. गौरींचे आगमन हा महिलांमध्ये उत्साह व चैतन्य निर्माण करणारा दिवस ठरला. शेतकरी महिलांची गौरी आगमनाची दुपारनंतर लगबग वाढली. घराघरांत गौरींची उत्साहात पूजा करण्यात येत आहे. या गौरींना बाजूबंद, लक्ष्मीहार, सुवर्णजडीत कंबरपट्टे, बोरमाळ, हार तसेच सोन्याचे विविध प्रकारचे दागिने घालून सजवले. दुसऱ्या दिवशी रविवारी (ता.४) गौरींचे पूजन करणार आहे.

रात्र जागविण्याची परंपरा
गौरीच्या आगमनाला झिम्मा-फुगडीचा महिलांनी ठेका धरला. याबरोबरच आता घरात झिम्मा-फुगडी, बस फुगडी आदी महिलांचे विविध खेळ रात्रभर सुरू राहणार आहेत. घरोघरी आलेल्या माहेरवाशिणींसोबत रात्र जागविण्याची परंपरा यंदाही उत्साहात चालविली जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02695 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..