घरफोडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरफोडी
घरफोडी

घरफोडी

sakal_logo
By

घरफोडीत पळविला
पावणेदोन लाखांचा ऐवज
तारदाळमध्ये घटना; दागिन्यांसह रोकडचा समावेश
इचलकरंजी, ता. १० : तारदाळ (ता. हातकणंगले) येथील संगमनगर भागात गणेशोत्सव मिरवणूक पाहण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबाचे बंद घर चोरट्यांनी फोडले. दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून कपाटातील सोन्याचे दागिने व रोकडवर डल्ला मारला. सुमारे साडेतीन तोळे सोने आणि रोख चाळीस हजार रुपये असा एकूण १ लाख ८० हजारांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबतची फिर्याद ज्योतीराम धोंडीराम पवार यांनी दिली.
पोलिसातून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी ज्योतीराम पवार येथील संगमनगर भागात कुटुंबासह राहतात. अनंत चतुर्दशीला शुक्रवारी (ता.९) सायंकाळी साडेसातच्या सुमारास ते कुटुंबासह गणेशोत्सव विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी इचलकरंजी शहरात आले होते. याचा फायदा उठवत रात्री आठ ते दहाच्या दरम्यान चोरट्यांनी दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. लोखंडी तिजोरीचे लॉक तोडून त्यातील दागिने पळविले. सोन्याचा अंगठ्या, बदाम आकाराचे सोन्याचे पान, लहान मुलांच्या कानातील सोन्याची फुले, सोन्याचे तुकडे असे एकूण साडेतीन तोळे सोने चोरीला गेले. तसेच याच कपाटातील रोख ४० हजार रुपयांवरही डल्ला मारला. एकूण १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मिरवणूक पाहून घरी येताच घरफोडी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. पवार यांनी शहापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. घटनास्थळी श्वानपथकाला पाचारण केले. अधिक तपास पोलिस करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02724 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..