इचलकरंजीला रेल्वे येण्यासाठी प्रबोधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इचलकरंजीला रेल्वे येण्यासाठी प्रबोधन
इचलकरंजीला रेल्वे येण्यासाठी प्रबोधन

इचलकरंजीला रेल्वे येण्यासाठी प्रबोधन

sakal_logo
By

इचलकरंजीला रेल्वे येण्यासाठी प्रबोधन
विविध पक्ष, संघटनांच्या स्वागत मंचावरून कृती समितीचे सहभागाचे आवाहन
इचलकरंजी, ता. ११ : अनंत चतुर्दशीला गणेश मंडळाचे स्वागत करण्यासाठी वेगवेगळ्या पक्षांचे, संघटनांचे मंच दरवर्षीप्रमाणे यावर्षीही होते. याच मंचावर जाऊन इचलकरंजी रेल्वे कृती समितीच्या सदस्यांनी इचलकरंजीला रेल्वे येण्याबाबत प्रबोधन केले. रेल्वेची इचलकरंजीला गरज आहे. ही गरज आपण सर्वजण मिळून पूर्ण करूया, असा संदेश सर्व मंचावरून दिला. गणेश मंडळ व गणेश भक्तांनाही इचलकरंजीला रेल्वे आणण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत, त्यामध्ये आपण सक्रिय व्हावे, असे प्रत्येक मंचावरून आवाहन केले.
सर्वच मंचावर रेल्वे कृती समितीच्या कार्यकर्त्यांचे स्वागत केले. इचलकरंजीला रेल्वे आणण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत, त्यामध्ये पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. रेल्वे कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी सर्व पक्षांच्या व संघटनांच्या मंचावर जाऊन इचलकरंजीला रेल्वेची गरज विषद केली. आतापर्यंत झालेल्या कार्याची माहिती दिली. पदाधिकारी व पक्षाच्या कार्यकर्त्यांना रेल्वे आणण्यासाठी पूर्ण सहकार्य व मार्गदर्शन मिळावे, असे आवाहन केले. इचलकरंजीला महानगरपालिका झाली, तालुका होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आता इचलकरंजीच्या विकासासाठी आणि वस्त्रोद्योगवाढीसाठी जनसामान्यांना परवडणारी रेल्वे आणण्यासाठी कृती समितीला या प्रबोधनाने मोठे पाठबळ मिळाले आहे. उपक्रमात रेल्वे कृती समितीचे सदस्य आणि रेल्वे सल्लागार समिती सदस्य (मध्य रेल्वे) श्रीनिवास शर्मा, दीपक पंडित, प्रदीप कांबळे, महेंद्र जाधव आदींनी सहभाग घेतला.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02727 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..