एटीएम बदलून फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एटीएम बदलून फसवणूक
एटीएम बदलून फसवणूक

एटीएम बदलून फसवणूक

sakal_logo
By

एटीएम कार्ड बदलून
पळविले ३१ हजार
इचलकरंजीत भामट्याचे कृत्य
इचलकरंजी, ता. १४ : यंत्रमाग कामगाराचे एटीएम कार्ड बदलून एकाने त्यांच्या बँक खात्यातील ३१ हजार ८०० रुपये पळविल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी सिकंदर नदाफ यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. संशयित भामटा अनोळखीचे एटीएम नदाफ यांच्या हातात देऊन पसार झाला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
सिकंदर नदाफ चंदूर येथील यंत्रमाग कारखान्यात काम करतात. नदाफ यांचे एका बँक शाखेत बचत खाते आहे. सोमवारी (ता. १२) ते एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले असता एटीएमजवळ असलेल्या ४० वर्षीय व्यक्तीने पैसे काढून देतो असे सांगत नदाफ यांचे एटीएम कार्ड घेतले. नदाफ यांनी त्याला पिनकोडही दिला. थोडावेळ प्रयत्न करून पैसे येत नसल्याचे सांगत तो एटीएम कार्ड नदाफ याला परत देऊन निघून गेला. त्यामुळे नदाफ पैसे काढण्यासाठी बँकेत गेले; पण त्यांच्या खात्यावर केवळ २० रुपये शिल्लक होते. त्यामुळे एटीएम कार्ड तपासले असता ते विजय कांबळे नावाचे असल्याचे समोर आले. नदाफ यांनी बँकचे स्टेटमेंट तपासले असता त्यांच्या खात्यावरून ३१ हजार ८०० रुपये काढल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नदाफ यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02746 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..