चार गायींचा मृत्यु | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार गायींचा मृत्यु
चार गायींचा मृत्यु

चार गायींचा मृत्यु

sakal_logo
By

लम्पी स्कीनने चार गायींचा मृत्यू
जांभळीतील घटना; गोठ्यातील ४०० पैकी ३० जनावरांना बाधा
सकाळ वृत्तसेवा
इचलकरंजी, ता. १७ : जांभळी (ता. शिरोळ) येथील चार गायी लम्पी आजाराने दगावल्या. जांभळी-नांदणी रोडवर ४०० हून अधिक गायी असणाऱ्या गोठ्यात तब्बल ३० गायींना लम्पीची लागण झाली होती. काही दिवसांपासून या गायींवर खासगी पशुवैद्यकियांकडून उपचार सुरू आहेत. मात्र, गेल्या आठवड्याभरापासून गायींच्या मृत्यूची मालिका सुरू असून, आतापर्यंत एकूण चार गायींचा लम्पी आजाराने मृत्यू झाला. यातील दोन गायी गाभण होत्या. सध्या बाधित नऊ गायी बऱ्या झाल्या आहेत. उर्वरित १७ गायींवर सध्या उपचार सुरू आहेत. उपचाराखालील असणाऱ्या अन्य गायींची प्रकृती चिंताजनक आहे.
दरम्यान, कुटवाड येथील एका गायीचाही लम्पीने मृत्यू झाला आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून लसीकरणासह अन्य उपाययोजना सुरू असल्या तरी दररोज बाधित आणि मृत्यूचा वाढता आकडा प्रशासनाची चिंता वाढविणारा आहे. जिल्ह्यात लम्पी आजाराने हातकणंगले तालुक्याबरोबर आता शिरोळ तालुक्यालाही वेठीस धरले आहे. तालुक्यातील जांभळी गाव हॉटस्पॉट बनले असून, बाधित जनावरांची संख्या वाढत आहे. अशा स्थितीत येथील मोटके-पाटील यांच्या ४०० गायींच्या गोठ्यातील तब्बल ३० गायींचा लम्पीची लागण झाली. बाधित गायींचे गेल्या आठवड्याभरापासून अलगीकरण केले आहे. मात्र, वाढता प्रादुर्भाव गायींना सहन झाला नाही. यातील दोन गाभण गायींसह चार गायींचा लम्पीने मृत्यू झाला आहे. सतरा गायींवार उपचार सुरू आहेत. तर उर्वरित नऊ गायी उपचारातून बऱ्या झाल्या आहेत. मात्र, उपचाराखालील काही गायींची प्रकृती चिंताजनक आहे. जांभळी गावातील सर्व पशुपालकांवर लम्पीची धास्ती असून बाधित गायींची संख्या ३० च्या घरात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02758 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..