न्यायसकुंलाच्या कामाला गती द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यायसकुंलाच्या कामाला गती द्या
न्यायसकुंलाच्या कामाला गती द्या

न्यायसकुंलाच्या कामाला गती द्या

sakal_logo
By

न्यायसकुंलाच्या कामाला गती द्या
इचलकरंजीतील शिष्टमंडळाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना साकडे
इचलकरंजी, ता. २० : येथील न्यायसकुंलाच्या कामाला गती द्यावी, अशी मागणी आमदार प्रकाश आवाडे आणि इचलकरंजी बार असोशिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. शिवराज चुडमुंगे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असून येथे अद्ययावत न्यायसंकुलाची असणारी नितांत तातडीची गरज यावेळी स्पष्ट करण्यात आली. मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी अद्ययावत अशा न्यायसंकुलासाठी आवश्यक निधीची तरतूद करुन हा प्रश्‍न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.
इचलकरंजी ही औद्योगिकनगरी असून याठिकाणी दहा न्यायालयाचे कामकाज चालते. मात्र वाढती संख्या पाहता याठिकाणी अद्ययावत न्यायसंकुलाची नितांत गरज आहे. या न्यायसंकुलास शासनाने तत्वत: मंजूरी दिलेली असून सार्वजनिक बांधकाम आणि नगररचना विभागाकडून मंत्रालयास अहवाल प्राप्त झाला आहे. शिवाय संचालक नगररचना विभाग पुणे यांचेकडून या कामाची फाईल नगरविकास विभागाकडे अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे पक्षकार, वकील, न्याय व्यवस्था व सामाजिक प्रश्‍नांची निकड लक्षात घेता शहरात न्यायसंकुल व न्यायाधिश निवासस्थान उभारण्यात येणार आहे. या संदर्भातील अंतिम टप्प्यातील काम शासन दरबारी प्रलंबित आहे. या संदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनी इचलकरंजी बार असोशिएशनच्या पदाधिकार्‍यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट घडवून आणली.यावेळी अतिरीक्त बार असोशिएशनचे अध्यक्ष मेहबूब बाणदार, उपाध्यक्ष अमित सिंग, अ‍ॅड. विश्‍वास चुडमुंगे, अ‍ॅड. स्वानंद कुलकर्णी, अ‍ॅड. अल्ताफ हुसेन मुजावर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02771 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..