स्काऊट गाईड उजळणी वर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्काऊट गाईड उजळणी वर्ग
स्काऊट गाईड उजळणी वर्ग

स्काऊट गाईड उजळणी वर्ग

sakal_logo
By

04591
स्काउट गाईड उजळणी वर्ग
इचलकरंजी : मुलांवर सेवेचा संस्कार करणारी स्काउट चळवळ वाढवूया, असे आवाहन जिल्हा संघटन आयुक्त (गाईड) सुषमा भोसले यांनी केले. दि न्यू हायस्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये कोल्हापूर भारत स्काउट्स आणि गाईड्स जिल्हा कार्यालयातर्फे स्काउट गाईड उजळणी वर्ग झाला. स्काउट चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक एस. ए. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिल्हा ट्रेनिंग कौन्सिलर मंगेश खोत यांना लायन्स क्लबचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार केला. पंडित कांबळे यांनी देश-परदेशातील स्काउटिंगचा धांडोळा घेतला. कबमास्टर संजय रेंदाळकर यांनी कब-बुलबुल योजनेची माहिती दिली. संजय नेबापुरे, संजय फुले, विठ्ठल किंचन्नावर, वैशाली खोंद्रे आदी उपस्थित होते.
------------
04590
भाजपतर्फे स्वच्छता अभियान
इचलकरंजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात सेवा पंधरवडा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत भारतीय जनता पक्षातर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जुना चंदूर रोड परिसरात पैलवान अमृता भोसले तसेच लिंबू चौक परिसरात संतोष शेळके, तमन्ना कोटगी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले. लिंबू चौक परिसर मुख्य मार्ग, सारण गटर, रस्त्याकडेला अनावश्यक असलेली झाडेझुडपे काढून, त्याचबरोबर बाजार कट्टा परिसरात स्वच्छता करण्यात आली. स्वच्छता अभियानात शहराध्यक्ष अनिल डाळ्या, प्रकाश पुजारी, अरविंद शर्मा, उत्तम चव्हाण आदी उपस्थित होते.
-------------
शैक्षणिक साहित्य वाटप
इचलकरंजी : रोटरी डेफ स्कूलमध्ये जैन फ्रेंड्‌स ग्रुपमार्फत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. सामाजिक भान राखत ग्रुपने हे कार्य केले. विद्यालयास एक स्मार्ट टीव्ही, २५ श्रवणयंत्र व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. मुख्याध्यापिका स्मिता रणदिवे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
----------------
‘स्वरतरंग’तर्फे आज कार्यक्रम
इचलकरंजी : स्वरतरंग संगीतप्रेमी मंच, कोल्हापूरतर्फे ‘दिल की आवाज भी सून’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहात शुक्रवारी (ता. २३) सायंकाळी पाच ते रात्री आठ या वेळेत कार्यक्रम होईल. कार्यक्रमाचा संगीतप्रेमी रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. मोफत प्रवेशिकेसाठी सुरेश लोले, रामचंद्र निमणकर, शीतल सातपुते यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02774 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..