मातृशक्ती दुर्गा वाहिनीतर्फे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मातृशक्ती दुर्गा वाहिनीतर्फे निवेदन
मातृशक्ती दुर्गा वाहिनीतर्फे निवेदन

मातृशक्ती दुर्गा वाहिनीतर्फे निवेदन

sakal_logo
By

04600
मातृशक्ती दुर्गा वाहिनीतर्फे निवेदन
इचलकरंजी : घटस्थापना व नवरात्रोत्सवात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेच्या मातृशक्ती दुर्गा वाहिनीतर्फे केली. मागणीचे निवेदन पोलिस उपाधिक्षक बी. बी. महामुनी यांना दिले. नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. विविध स्पर्धा, कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये महिला मोठया प्रमाणात सहभागी होत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांवर असते. याकाळात महिलांना काही समाज कटंकाकडून त्रास दिला जातो. कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून योग्य ती खबरदारी घ्यावी व आयोजकांची बैठक घेऊन अटी व शर्थीचे नियमावली घालून द्यावी, अशी मागणी महिलांनी केली. शिष्टमंडळात मातृशक्ती दुर्गावाहिनीच्या पदाधिकारी सौ. हणमासागर, सौ. वैशाली माने, सौ. स्मिता हंचनाळे, सौ. संगिता चव्हाण, सौ. कविता पसनूर आदी उपस्थित होते.
---------
04599
प्रसाद फुटाणे यांना पुरस्कार
इचलकरंजी : येथील प्रसाद फुटाणे यांना उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार मिळाला. द सण आर्ट स्टुडिओ आयोजित सांगली येथे घेतलेल्या फोटो व्हिडिओ एक्स्पो प्रदर्शनात हा पुरस्कार त्यांना दिला. कै. विजयकुमार जप्तीवाले यांच्या स्मरणार्थ आणि कै. लक्ष्मण सिद्राम घोंगडे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सन्मानित केले. शरद सारडा, संजय सारडा, सागर घोंगडे, सचिन घोंगडे, हर्षद खाडे, दिलीप गोटे आदी उपस्थित होते.
---------
मुसळे विद्यालयाचे यश
इचलकरंजी : तात्यासाहेब मुसळे विद्यालय अँड ज्युनिअर कॉलेजने बारावी सीईटी परीक्षेत यश प्राप्त केले. परीक्षेत कॉलेजमधील अनुक्रमे भावना मगदूम (९८.९३ टक्के), पार्थ बुचडे (९८.१७), शिवराज हिंगमिरे (९७.१४), अभिषेक माने (८५.२०) टक्के गुण मिळवून यश प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार किशोर मुसळे, संस्थेचे अध्यक्ष डी. एम. कस्तुरे यांच्याहस्ते केला. सचिव आनंदा साखरे, खजिनदार राजेंद्र सांगले उपस्थित होते. विद्यार्थ्यांना प्राचार्य आर.बी. गांजवे, डी. बी. टारे, विभाग प्रमुख सुहास सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02779 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..