मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मारहाण
मारहाण

मारहाण

sakal_logo
By

पत्नीची छेड काढल्याने
मारहाणीत एक जण गंभीर
शहापूरजवळ भरस्त्यात माऱ्याने हल्ला
इचलकरंजी, ता. २२ : पत्नीची छेड काढल्याचा रागातून एकाने भररस्त्यात लाकडी मागाच्या माऱ्याने एकाला गंभीर जखमी केले. याप्रकरणी कुमार महाजन (निमशिरगाव, ता. शिरोळ) याच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना आज सकाळी सव्वाअकराच्या सुमारास तारदाळ ते शहापूर मार्गावर घडली. याबाबतची फिर्याद जखमी राहुल सुरेश कोडणीकर (वय ३८) यांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, जखमी कोडणीकर व संशयित महाजन एकमेकांचे ओळखीचे आहेत. दीड वर्षापूर्वी कोडणीकर याच्या पत्नीची छेड काढल्यावरून दोघांमध्ये भांडण झाले होते. हा राग मनात धरून कोडणीकर तारदाळ ते शहापूर मार्गाने चालत कामावर निघाले असता महाजन याने त्यांना अडवले. कुंभार दवाखान्यासमोर आले असता महाजन याने तुझा दीड वर्षापासून त्रास सहन करत असून तुला सोडत नाही, असे म्हणत शिवीगाळ केली. लाकडी मागाच्या माऱ्याने डोक्यात मारहाण केली. यास प्रतिकार केला असता याच माऱ्याने त्यांच्या उजव्या हातावर व मनगटावर मारहाण करत गंभीर जखमी केले. जखमी कोडणीकर याच्यावर आयजीएम रुग्णालयात उपचार केले. याप्रकरणी कोडणीकरच्या फिर्यादीनुसार कुमार महाजन याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Jmh22b02785 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..