शहरवासियांना पाणी देणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहरवासियांना पाणी देणार
शहरवासियांना पाणी देणार

शहरवासियांना पाणी देणार

sakal_logo
By

इनामतर्फे महापालिकेस निवेदन
इचलकरंजी : सुळकूड पाणी योजना प्रभावीपणे राबवून शहरवासीयांना पाणी देणार असल्याचे आश्वासन महानगरपालिकेचे उपायुक्त डॉ. प्रदीप ठेंगल यांनी इनामच्या शिष्टमंडळास दिले. नदीकाठच्या गावाचा योजनेस विरोध होत असून दूधगंगा योजनेविषयी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करण्याबाबतचे निवेदन उपायुक्त डॉ. ठेंगल याना इनामच्या शिष्टमंडळाने दिले. शहरासाठी नुकतीच अमृत २ मधून दुधगंगा उद्‍भव सुळकूड पाणी योजना मंजूर झाली आहे. मात्र शहरावर पाण्यासाठी अन्याय होत असून आता सुळकूड योजना आणताना यामध्ये कोणीही राजकारण व दुजाभाव करू नये व प्रशासनाने कठोरपणे योजना राबवून शहरवासीयांना पाणी मिळवून द्यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.