नवरात्रोत्सवाचा फळबाजाराला बुस्टर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवरात्रोत्सवाचा फळबाजाराला बुस्टर
नवरात्रोत्सवाचा फळबाजाराला बुस्टर

नवरात्रोत्सवाचा फळबाजाराला बुस्टर

sakal_logo
By

04643
04644
--------------------
नवरात्रोत्सवाचा फळ बाजाराला बूस्टर
इचलकरंजीत फुलांच्या दरात तिप्पट, चौपटीने वाढ; खाद्यतेलाच्या दरात घट
इचलकरंजी, ता. २९ : ऐन नवरात्रीत फुलांचे दर फारच वाढले आहेत. प्रतिकिलो प्रति फुलांच्या दरात साधारण तीन पट व चौपट वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीत फुल बाजार चांगलाच तेजीत आहे. निशिगंध, झेंडू या फुलांना मागणी जोमात असून पूर्तता करताना फुल विक्रेते वेठीस येत आहेत. हार, फुले, फुलांच्या माळा यांना मागणी बाजारात मोठ्या प्रमाणात आहे. फळ बाजारालाही नवरात्र उत्सवाचा जबरदस्त बूस्टर मिळाला आहे. सर्व प्रकारच्या फळांची आवक चांगली होत असून मागणी उत्तम आहे. सफरचंद, केळीची सर्वाधिक चलती आहे; मात्र केळीच्या वाढत्या दराचा सामना ग्राहकांना करावा लागत आहे.
सणासुदीच्या कालावधीत खाद्यतेलानेही गोडवा वाढवला आहे. तेलाच्या दरात प्रतिकिलो सुमारे ५ ते १० रुपयांची घट झाली आहे. उतरत्या दरामुळे सणासुदीतील गृहिणींचे बजेटसुद्धा सुखावले आहे. दिवाळीपर्यंत दरात आणखीन घसरण होण्याची शक्यता खाद्यतेल विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. भाजीपाला बाजारात मात्र मागणी काहीशी घटली आहे. त्यामुळे होणाऱ्या आवकेची घडी बसत नसली तरी वाढते सध्या स्थिर आहेत. पालेभाज्यांची अवस्था या आठवड्यातही जैसे थे आहे. कोथिंबीरच्या रांगेत मेथी आली असून अन्य पालेभाज्यांचे दर २० च्या घरात पोहोचले आहेत. लिंबूच्या वाढत्या दराचा चढता क्रम सुरूच असून दिवसेंदिवस आवकही घटत आहे. वांग्याचा दर आता कडक होत आहे. बाजार समितीत सौद्याला दर जादा निघत असल्याने किरकोळ बाजारात दर वाढत आहेत. हळूहळू कांद्याचे दरही वाढण्यास सुरूवात झाली आहे. रताळ्याचा हंगाम सुरू झाला असून कर्नाटक भागातून अपेक्षित आवक अद्याप होताना दिसत नाही. भुईमुगाच्या काढणीचा हंगाम जवळ आल्याने ओल्या शेंगा बाजारात ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

- - - - - - - -
प्रतिकिलो रुपये भाजीपाला : टोमॅटो- ३५ ते ४०, दोडका-४० ते ५०, वांगी-५० ते ६०, कारली-३० ते ४०, ढोबळी मिरची- ४० ते ५०, मिरची-४० ते ५०, फ्लॉवर-३० ते ४०, कोबी-२५ ते ३०, बटाटा-२५ ते ३०, कांदा -२५ ते ३०, लसूण- ४० ते ५०, आले- ६० ते ८०, लिंबू- ३०० ते ६०० शेकडा, गाजर-५० ते ६०, बीन्स- ७० ते ८०, भेंडी ५० ते ६०, काकडी- ५० ते ६०, हिरवा वाटाणा-५० ते ६०, गवार- ६० ते ८०, रताळे -४०, दुधी २५ ते ३०, कोंथिबीर ३० ते ४०, मेथी -३० ते ३५ रुपये, अन्य पालेभाज्या १५ ते २० रुपये पेंढी.
- - - - - - - -
खाद्यतेल : सरकी - १३० ते १३५, शेंगतेल - १८० ते १८५, सोयाबीन -१२५ ते १३०, पामतेल -१०० ते १०५, सूर्यफूल १४५ ते १५०.
- - --- - - -
फुले - झेंडू - ५० ते ६०, निशिगंध- २०० ते २२०, गुलाब - २०० ते २५०, गलांडा- ८० ते २००, शेवंती- १०० ते १२०, आष्टर -१५० ते १६०.
- - - -- - -
फळे : सफरचंद-८० ते १६०, संत्री -१५० ते २५०, मोसंबी-८० ते १००, डाळिंब-८० ते १५०, चिकू-८० ते १२०, पेरू-३० ते १००, सीताफळ -८० ते १००, खजूर - १५० ते २००, पपई- ३० ते ५०, अननस -८० ते १००, मोर आवळा -८० ते १००, केळी- ४० ते ५० डझन, देशी केळी - ६० ते ७० डझन, किवी -१०० -१२० (लहान बॉक्स), ड्रॅगन- १०० ते १२०, चिंच-१०० ते १४०, लेची -३५० ते ४००, नासपती- १००-१२०.
-- -
कडधान्य : हायब्रीड ज्वारी- २५ ते २८, बार्शी शाळू- ३० ते ५०, गहू- २८ ते ३६, हरभराडाळ -६० ते ६२, तूरडाळ- १०० ते १०८, मूगडाळ- ८६ ते ९२, मसूरडाळ- ८५ ते ८७, उडीदडाळ- १०० ते १०८, हरभरा- ५० ते ५३, मूग- ८० ते ८७, मटकी- १३० ते १३५, मसूर- ८०, फुटाणाडाळ-७० ते ७२, चवळी-८०, हिरवा वाटाणा-६०, छोला - १००.
- - - - - - - - - - - -
खाऊच्या पानांची उलाढाल वाढली
नवरात्र उत्सव सुरू होताच खाऊच्या पानांची उलाढाल शहरात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. घटस्थापनेला सुमारे १००० ते १२०० खाऊच्या पानांच्या डबक्यांची आवक बाजार समितीत झाली. सध्या दररोज तीनशे ते साडेतीनशे डबक्यांची आवक होत आहे. उत्सवात खाऊच्या पानांना मोठ्या प्रमाणात डिमांड असून वर्षातील सर्वांत मोठी उलाढाल होत असते. काही दिवसांवर दिवाळीचा सण आल्याने उलाढालीचा टक्का असाच राहतो.