डीकेएएससी महाविद्यालयाचे यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डीकेएएससी महाविद्यालयाचे यश
डीकेएएससी महाविद्यालयाचे यश

डीकेएएससी महाविद्यालयाचे यश

sakal_logo
By

डीकेएएससी महाविद्यालयाचे यश
इचलकरंजी : शिवाजी विद्यापिठात गांधी अभ्यास केंद्रातर्फे आयोजित पोस्टर मेकिंग स्पर्धेत डीकेएएससी महाविद्यालयाने यश मिळवले.
महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत या विषयावर वनस्पतीशास्त्र विभागाचा विद्यार्थी वैभव गौंड याने तयार केलेल्या पोस्टरला द्वितीय क्रमांक मिळाला. प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्याहस्ते त्याचे अभिनंदन केले. प्रमाणपत्र व रोख रक्कम पारितोषिकाचे स्वरूप होते. डॉ. एस. टी. इंगळे, डॉ. एस. के. गावडे, मेजर मोहन वीरकर उपस्थित होते. त्याला प्रा. डॉ. मधुमती शिंदे तसेच वनस्पतीशास्त्र विभागातील प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले.
---------
56179

डॉ. कांबळेंच्या पुस्तकाचे प्रकाशन
इचलकरंजी : येथील प्रा. डॉ. ए. एस. कांबळे यांच्या ''कन्तौर्स ऑफ कम्युनिकेशन'' या संदर्भग्रंथाचा प्रकाशन झाले. ते कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, इस्लामपूर येथे कार्यरत आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. देवेंद्र कावडे (बेंगलोर), डॉ. रजनीश कामत (मुंबई), डॉ. सुधाकर मानकर(पुणे), सरोज पाटील व प्राचार्य डॉ. अरुण पाटील उपस्थित होते. सोशल मिडीया, मास कम्युनिकेशन, मोबाईल कम्युनिकेशन व त्यास पूरक तंत्रज्ञानासंबंधी माहिती समाविष्ट केली आहे. प्रा. संगीता पाटील, प्रशांत पाटील, महेश पाटील, दिलीप पाटील, सतीश पाटील, डॉ. प्रमोद गंगान्मले उपस्थित होते.
---------
56181
कन्या महाविद्यालयात कार्यशाळा
इचलकरंजी : येथील श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात रुमाली बुके तयार करण्याची कार्यशाळा झाली. राष्ट्रीय छात्र सेना आणि महिला सक्षमीकरण व तक्रार निवारण समितीतर्फे आयोजन केले. प्रा. मेजर मोहन वीरकर यांनी विद्यार्थीनींना रुमाली बुके बनवण्याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. त्रिशला कदम होत्या. कॅप्टन प्रमिला सुर्वे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. आभार प्रा. संगीता पाटील यांनी मानले.
---------
पोस्टर प्रदर्शनाचे आयोजन
इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयात बी. कॉम आय.टी विभागातर्फे पोस्टर प्रदर्शन झाले. ‘अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञान संकल्पना’ या विषयावर विद्यार्थ्यानी प्रदर्शन भरवले. प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी केले. विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञानातून विकास, क्लावूड कॉम्प्युटिंग, सायबर क्राईम, ५जी तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग आणि ब्लॉक चेन तंत्रज्ञान'' असे विविध कलात्मक, प्रयोगशील पोस्टर तयार केले. उपप्राचार्य डॉ. डी. सी. कांबळे, प्रा डॉ. डी. ए. यादव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्रेरणा हळदकर यांनी केले. आभार अमृता निकम यांनी मानले. सूत्रसंचालन खुशी खांडेलवाल यांनी केले.
--------
जयप्रकाश नारायण यांना अभिवादन
इचलकरंजी : आंतरभारती विद्यालयात लोकनायक जयप्रकाश नारायण यांची जयंती साजरी केली. जिमखाना प्रमुख आर.बी. परीट यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सौ. एस. ए. यांच्याहस्ते त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले. पर्यवेक्षिका सौ. व्ही. सी. फाटक यांनी जयप्रकाश नारायण यांच्या जीवन कार्याची ओळख करून दिली. मुख्याध्यापक एम. डी. पाटील, एम. बी. कुंभार आदी उपस्थित होते.