मारहाण, ॲट्रॉसिटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मारहाण, ॲट्रॉसिटी
मारहाण, ॲट्रॉसिटी

मारहाण, ॲट्रॉसिटी

sakal_logo
By

किरकोळ कारणावरून
इचलकरंजीत दोन गटांत वाद

घरात घुसून मारहाण; परस्परविरोधी गुन्हे दाखल
इचलकरंजी, ता. १५ : येथील अण्णा रामगोंडा शाळेच्या पाठीमागे किरकोळ कारणावरून दोन गटांत वाद झाला. या वादातून घरात घुसून मारहाणीचा प्रकार घडला. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये रोहन जयपाल लोखंडे (वय २१, रा. इचलकरंजी) यांच्या फिर्यादीनुसार हरिषचंद्र केसरवाणी यांच्यासह ८ जणांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ करत मारहाण केल्याचा तर हरिषचंद्र बाबाराम केसरवाणी (वय ३८) यांच्या फिर्यादीनुसार मारहाण केल्याप्रकरणी रोहन लोखंडे याच्यासह ८ जणांच्या विरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १४) रात्री सव्वादहा वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शुक्रवारी रात्री रोहन लोखंडे घरासमोर थांबले होते. यावेळी हरिषचंद्र केसरवाणी हा गाडी घेऊन तेथून जात होता. त्यावेळी लोखंडे यांनी गाडी हळूच चालवण्यास सांगितल्याच्या कारणावरून त्यांच्यात वाद झाला. यावेळी केसरवाणी यांनी जातीवाचक शिवीगाळ करत लोखंडे यास मारहाण केली. त्यानंतर केसरवाणी याच्यासह ८ जणांनी काठ्या, लाकडाचे ओंडके, लोखंडी रॉड घेऊन लोखंडे यांच्या घरात घुसून नातेवाईकांना मारहाण करत प्रापंचिक साहित्याचे नुकसान केल्याचे लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
तर केसरवाणी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, गाडीत पेट्रोल टाकून घरी जात असताना रोहन लोखंडे याने अंगावर गाडी घालतोस काय असे म्हणत शिवीगाळ करून केसरवाणी यांना काठीने मारहाण केली. त्यामुळे पुतणे अभिषेक आणि आखिलेश यांना फोन करून बोलावून घेतले असता त्यांनाही काठी, फावड्याने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर रोहन लोखंडे, जयपाल लोखंडे, प्रकाश लोखंडे यांच्यासह जमावाने केसरवाणी यांच्या घर आणि दुकानावर दगडफेक करून नुकसान करत नातेवाईकांनाही जखमी केल्याचे म्हटले आहे.
-------------------