कन्या महाविद्यालयात मानसिक आरोग्य दिन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कन्या महाविद्यालयात मानसिक आरोग्य दिन
कन्या महाविद्यालयात मानसिक आरोग्य दिन

कन्या महाविद्यालयात मानसिक आरोग्य दिन

sakal_logo
By

56660
कन्या महाविद्यालयात मानसिक आरोग्य दिन
इचलकरंजी : श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात मानसशास्त्र विभाग व कन्या महाविद्यालय, मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला. मनःस्वास्थ्य संवर्धन या विषयावर व्याख्यान झाले. ‘आनंदी राहा आणि यशस्वी व्हा’ या विषयावर भित्तीपत्रिकेचे उद्‍घाटन झाले. प्रा. रमेश कट्टीमनी यांनी व्याख्यानात मन स्वास्थ्य ठेवण्यासाठी आनंदी राहा, मैत्री करा, एकटे राहू नका, असा सल्ला दिला. प्रास्ताविकेत प्रा. कॅप्टन प्रमिला सुर्वे यांनी मानसिक आरोग्य दिन साजरा करण्याबाबतचा हेतू स्पष्ट केला. अध्यक्षस्थानी प्राचार्या डॉ. प्रो. त्रिशला कदम होत्या. आभार प्रा. पर्वत कांबळे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. शुभांगी पाटील यांनी केले.
-------------------------
56661

इचलकरंजी : डीकेएएससी महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातर्फे एम एससी भाग१ चा स्वागत समारंभ व अभिमुखता कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे कोल्हापुरातील विवेकानंद महाविद्यालयाचे प्रोफेसर डॉ. एस. एस. अंकुशराव उपस्थित होते. त्यांनी एम एस्सीनंतरच्या नोकरीच्या संधी आणि संशोधनातील संधी याबद्दल मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी उपप्राचार्य प्रा. डी. ए. यादव होते. प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. आभार प्रा. एस. आर. मोरे यांनी मानले. सुत्रसंचालन श्रुतिका गाडेकर आणि आरजू शेख यांनी केले.
--------
56662
वाडमय मंडळाचे उद्‍घाटन
इचलकरंजी : श्रीमती आक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयात मराठी विभागातर्फे नाटककार वसंत कानेटकर, कविवर्य वसंत बापट, कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून वाडमय मंडळाचे उद्‍घाटन झाले. स्पंदन भित्तीपत्रिका प्रदर्शन भरवले. प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. सर्जेराव जाधव यांनी मार्गदर्शन केले. भावनिक उमाळा म्हणजे काव्य आहे. मराठी साहित्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. साहित्यातून मानवाला अंतर्बाह्य बदलण्याची ताकद आहे. मानवी जीवन तसे कवितेला वाहिलेले असून काव्य माणसाला जगायला शिकविते. आपल्या काळजात कविता घर करते आणि मानवी जीवन समृद्ध करते, असे डॉ. जाधव यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी प्राचार्या प्रो. डॉ. त्रिशला कदम होत्या. कुसुमाग्रज स्नेही मंडळाची स्थापना केलेल्या सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
------------
भित्तीपत्रिका प्रदर्शनाचे आयोजन
इचलकरंजी : दत्ताजीराव कदम आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजमध्ये गणित व रिसर्च प्रमोशन अँड मॉनिटरिंग सेल विभागातर्फे भित्तीपत्रिका प्रदर्शन आयोजित केले. प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांच्याहस्ते प्रदर्शनाचे उद्‍घाटन झाले. बी. एस्सी. भाग ३ गणित विभागातील विद्यार्थ्यांनी विविध संकल्पना गेम थेरी, पास्कल ट्रँगल, अँप्लिकेशन्स ऑफ मॅथेमॅटिकस, मॅथेमॅटिकस इन म्युसिक, कॅरियर इन मॅथेमॅटिकस आदी विषयावर आधारित भित्तीपत्रिका प्रदर्शित केल्या. प्राध्यापकांनी कलात्मक, प्रयोगशील पोस्टर उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी उपप्राचार्य प्रा.डी.ए. यादव, विभागप्रमुख प्रा. डी. जे. मुंगारे, डॉ. विनायक गानबावले, डॉ. दिपक कुंभार डॉ. सागर सुतार, प्रा. वृषाली हत्तरगी, प्रा. स्वाती खोत उपस्थित होते. निकिता मोहिते हीने आभार मानले. सूत्रसंचालन किरण जुगले हिने केले.
------------
जाधव विद्यामंदीरमध्ये दात तपासणी
इचलकरंजी : येथील शंकरराव जाधव विद्या मंदिरात मुलांची दात तपासणी लायन्स क्लबतर्फे केली. हेल्दी स्कूल उपक्रमांतर्गत मोफत मुलांची दात तपासणी केली. शिबिरात प्रसिद्ध दाततज्ञ डॉ. तेजल दरक व डॉ. सेजल मोदी यांनी ८० मुलांची तपासणी करत औषधोपचार केले. तसेच मुलांच्या आरोग्याची घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. क्लबतर्फे मुलांना ब्रशचे वाटप करण्यात आले. लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र बालर, सेक्रेटरी सुभाष तोष्णीवाल, संदीप सुतार, सौ. श्रुतिका भंडारी, सौ. कांता बालर, मुख्याध्यापिका सौ. गीता पाटील, सचिन वारे उपस्थित होते.
----------------
न्यू हायस्कूलमध्ये गणवेश वाटप
इचलकरंजी : गोविंदराव हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांकडून दि न्यू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये गणवेश वाटप केले. १९९० च्या दहावीच्या ऋणानुबंध बॅचने विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप केले. राहुल खंजिरे, प्रसन्न कुलकर्णी, संदीप मोरे, दत्तात्रय खोत, प्रकाश कुलकर्णी यांनी एकत्र येऊन सामाजिक कार्याच्या जाणिवेतून ही मदत केली. स्वागत मुख्याध्यापक एस. ए. पाटील यांनी केले. आभार बी.ए. कोळी यांनी मानले. सूत्रसंचालन सौ. बिरनाळे यांनी केले.