मुलगी सुखरूप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलगी सुखरूप
मुलगी सुखरूप

मुलगी सुखरूप

sakal_logo
By

इचलकरंजीत बाजारपेठेत
हरविलेली मुलगी सापडली
इचलकरंजी, ता.२३ : बाजारपेठेत दिवाळीची खरेदी करताना हरवलेल्या सात वर्षीय मुलीला पोलिसांनी आई-वडिलांकडे सुखरूप पोहचवले. आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास हॉटेल तारा परिसरात ही मुलगी आढळली. मुलीची ओळख पटवल्यानंतर तिच्या आईच्या ताब्यात देण्यात आले आहे. तारा हॉटेल परिसरात सात वर्षांची लहान मुलगी रडत असताना नागरिकांना दिसली. तिला मराठी अथवा हिंदी भाषा येत नव्हती. तिला आई-वडिलांच्या पत्त्याबाबत काहीच सांगता येत नव्हते. दिवाळीची खरेदी करण्याकरिता आलेले संदीप प्रकाश रावळ (रा. वेताळ पेठ) हे या मुलीस शिवाजीनगर पोलिस ठाण्यात घेऊन आले. त्यानंतर शिवाजीनगर व इचलकरंजी पोलिस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांनी मुलीचा फोटो सोशल मीडियावर पाठवून मुलीच्या आईचा शोध घेतला. अल्पवयीन मुलीची आई पोलिस स्टेशनला आल्यानंतर मुलीची ओळख पटली. कपडे खरेदी करत असताना मुलगी तारा हॉटेलजवळ हरवली होती, असे आईने सांगितले.