मारहाण,अ‍ॅट्रासिटी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मारहाण,अ‍ॅट्रासिटी
मारहाण,अ‍ॅट्रासिटी

मारहाण,अ‍ॅट्रासिटी

sakal_logo
By

इचलकरंजीत कुटुंबास मारहाण

इचलकरंजी, ता. २५ : फटाके उडवण्याच्या कारणातून तिघांनी एका कुटुंबीयास मारहाण केल्याची घटना घडली. मारहाण करत व जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना येथील साई-समर्थनगर भागात घडली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी (ता. २४) रात्री लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कांबळे कुटुंबीय दारात फटाके उडवत होते. त्यांनतर एवढ्या रात्री फटाके का उडवत आहात, असे म्हणून जातिवाचक शिवीगाळ करून अर्जुन खोत व त्याचे दोन चुलतभाऊ यांनी निवास कांबळे व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण करून जखमी केले. याबाबत कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अर्जुन याच्यासह त्याच्या दोन चुलत भावांवर अ‍ॅट्रासिटी व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.