झाडावरून पडून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झाडावरून पडून मृत्यू
झाडावरून पडून मृत्यू

झाडावरून पडून मृत्यू

sakal_logo
By

मोहमद कैफ तौफिक नदाफ

इचलकरंजीत
झाडावरून पडून
शाळकरी मुलाचा मृत्यू

इचलकरंजी, ता. २७ : पेरूच्या झाडावरून पडून येथील एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मोहमद कैफ तौफिक नदाफ (वय १२) असे त्याचे नाव आहे. झाडावरून तब्बल वीस फुटांवरून खाली पडल्याने डोक्याला व हाताला गंभीर इजा झाली. उपचारासाठी त्याला आयजीएम रुग्णालयात दाखल केले; मात्र उपचारदरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ही घटना आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास गावभागातील नदीवेस नाका मुजावर पट्टी गल्लीत घडली.
मृत नदाफ येथील एका माध्यमिक शाळेत पाचवीत शिकत होता. आज सकाळी तो घरासमोरील झाडावर पेरू काढण्यासाठी चढला. काही काळाने त्याचा पाय घसरला आणि तो जमिनीवर आपटला. त्याचा आरडाओरडा ऐकून घरातील व शेजारील नागरिकांनी त्याला येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टर नसल्याने त्याला आयजीएम रुग्णालयात हलवले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गावभाग पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेची गावभाग पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.