व्यंकटेश महाविद्यालयाचे युवा महोत्सवामध्ये यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यंकटेश महाविद्यालयाचे युवा महोत्सवामध्ये यश
व्यंकटेश महाविद्यालयाचे युवा महोत्सवामध्ये यश

व्यंकटेश महाविद्यालयाचे युवा महोत्सवामध्ये यश

sakal_logo
By

04796
इचलकरंजी : युवा महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी संस्थेचे चेअरमन कृष्णा, प्राचार्य डॉ. व्ही. ए. माने आदी.

व्यंकटेश महाविद्यालयाचे
युवा महोत्सवात यश
इचलकरंजी, ता. ३० : श्री व्यंकटेश महाविद्यालयाने युवा महोत्सवात यश प्राप्त केले. शिवाजी विद्यापीठाचा ४२ वा जिल्हास्तरीय युवा महोत्सव प्रथम गडहिंग्लज येथे झाला. यात लोककला प्रकारांमध्ये ‘भोंडला’ नृत्य सादर करीत व्यंकटेश महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यानंतर आटपाडी येथे झालेल्या मध्यवर्ती युवा महोत्सवातही तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्यांना सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. एस. एच. आंबवडे, एस. टी. बिरंजे यांचे मार्गदर्शन लाभले. लोककलेतील ‘भोंडला’ या कलाप्रकारात महाविद्यालयातील तमन्ना मुल्ला, माया ढोली, साक्षी कदम, संस्कृती पाटील, स्नेहल गोंदकर, श्रुती ठोंबरे, प्राजक्ता कोल्हापुरे, सृष्टी सातपुते, सानिया गवंडी, प्राची पंडित, शफिक मुल्ला या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. प्राचार्य डॉ. व्ही. ए. माने यांनी सांस्कृतिक विभाग व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यासाठी उपप्राचार्य प्रा. डॉ. एन. एम. मुजावर, डॉ. बी. एन. कांबळे, डॉ. एस. एन. जरंडीकर, प्रा. अमीन बाणदार यांचे सहकार्य लाभले. यशस्वी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा संस्थेचे चेअरमन कृष्णा बोहरा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.