पोलीस वृत्त पट्टा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलीस वृत्त पट्टा
पोलीस वृत्त पट्टा

पोलीस वृत्त पट्टा

sakal_logo
By

इचलकरंजीत घरफोडी

इचलकरंजी: येथील विक्रमनगर भागात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे ४४ हजारांचा मुद्देमाल चोरला. प्रकाश माधवराव साडुंर हे कुटुंबासह विक्रमनगर भागात गल्ली नंबर तीनमध्ये राहतात. शुक्रवारी (ता. २८) ते बाहेरगावी गेले होते. शनिवारी सकाळी चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरट्यांनी ४० हजारांची रोकड, ३ हजारांचा चांदीचा छल्ला आणि सोन्याच्या २ लहान अंगठ्या यांच्यावर डल्ला मारला.
----------------
फसवणूक झालेली युवती
नातेवाइकांकडे सुखरूप
इचलकरंजी : सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेमाच्या जाळ्यात ओढलेल्या प्रियकराने युवतीला येथील मध्यवर्ती बस स्थानकात सोडून पळ काढला. निर्भया पथकाने संबंधित युवतीला ताब्यात घेऊन मध्य प्रदेशमधील तिच्या नातेवाइकांशी संपर्क साधला. अखेर आज त्या युवतीला स्थानिक पोलिसांनी तिचे नातेवाईक आणि मध्य प्रदेश पोलिसांकडे सोपविले. सोशल मीडियावरुन कर्नाटकातील एका तरुणाचा मध्य प्रदेशातील खांडवा जिल्ह्यातील युवतीशी संपर्क झाला. त्यातूनच दोघांची ओळख झाली आणि त्याचे प्रेमात रूपांतर झाले. त्यातूनच प्रियकराने तिला शिमोगा येथील घरी नेले. त्याच्या नातेवाइकांनी तिला नकार दिल्याने प्रियकराने युवतीला येथील मुख्य बस स्थानकात सोडून पसार झाला होता. ही घटना निर्भया पथकाच्या निदर्शनास आल्यावर तिला विश्‍वासात घेऊन माहिती घेतली असता तिची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन तिच्या मध्य प्रदेशमधील नातेवाइकांशी संपर्क साधला. आज स्थानिक पोलिसांनी स्थानिक पोलिसांनी तिला नातेवाईक आणि मध्य प्रदेश पोलिसांकडे सोपविले.
----------
इचलकरंजीत अपघातात दाम्पत्य जखमी
इचलकरंजी : भरधाव वेगाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने एक दाम्पत्य जखमी झाले. राजू मारुती परीट व त्यांची पत्नी सुनीता राजू परीट (दोघे रा. सदलगा, जि. बेळगाव) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांत अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. हा अपघात आरगे मळा भागात शहापूर मार्गावर घडला. विक्रमनगर परिसरातील आरगे मळा गल्ली नंबर तीनमध्ये एक अल्पवयीन मुलगा निष्काळजीपणे भरधाव वेगाने इलेक्ट्रिक बाईकवरून ट्रिपलसीट जात होता. या मुलाने भरधाव वेगाने समोरून येणाऱ्या मोटारसायकल जोराची धडक दिली. यात फिर्यादी राजू परीट व त्यांची पत्नी खाली पडले. राजू परीट यांच्या गुडघ्याला मार लागून ते जखमी झाले, तर त्यांच्या पत्नीच्या डोक्याला मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघाताची नोंद गावभाग पोलिस ठाण्यात झाली आहे.